जय श्रीराम लिहिलेले १७ हजार पत्र खा. पवारांना केले पोस्ट.
भाजयुमोचे जिल्ह्यात निषेध आंदोलन.
Bhairav Diwase. July 25, 2020
चंद्रपूर:- अयोद्धेत प्रभूश्रीरामचे मंदिर उभारण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केला.शेकडो वर्षाचा लढा रामभक्तांनी जिंकला.मुस्लिम बांधवांनी पण याचे स्वागत केले.म्हणून आता अयोद्धेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते निर्माण कार्याचा शुभारंभ होत आहे.करोडो रामभक्तांच्या अस्मितेचा हा प्रश्न होता.या निर्माणकार्याच्या शुभारंभाचे स्वागत करणे सोडून खा शरद पवार यांनी खोचक टिकास्त्र सोडले.मंदिर बांधून कोरोना जाईल का.? असा प्रश्न त्यांनी केला.त्यांचे हे वक्तव्य कोट्यवधी देशबांधवांच्या भावना दुखावणारे आहे.खा पवारांचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो.प्रभुरामाचा हा अपमान रामभक्त कधीही सहन करणार नाही.राम मंदिर हा विशेषत्वाने हिंदूंच्या अस्मितेचा प्रश्न होता व आहे,पवारांनी उगाच राजकारण करू नये,असे प्रतिपादन भाजपा जिल्हाध्यक्ष(महानगर) डॉ मंगेश गुलवाडे यांनी केले.
ते प्रियदर्शिनी चौक येथे शुक्रवार (२४ जुलै)ला भा ज यु मो तर्फे आ.सुधीर मुनगंटीवार यांचे मार्गदर्शनात आयोजित 'पत्र भेजो - निषेध करो' आंदोलन प्रसंगी खा शरद पवार यांचा निषेध नोंदविताना बोलत होते.*
*यावेळी महापौर राखी कंचरलावार,नगरसेवक ,सुभाष कासंगोट्टूवार,भाजयुमो जिल्हाध्यक्ष ब्रिजभूषण पाझारे,प्रशांत विघ्नेश्वर,प्रज्वलन्त कडू,सुरज पेदुलवार,अमीन भाई,सुनील डोंगरे, यश बांगडे,कुणाल गुंडावार,स्नेहीत लांजेवार,सचिन यामावार, निखाते,विक्की मेश्राम,सलमान पठाण यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.*
*खा. शरद पवार यांनी तसे वक्तव्य करणे म्हणजे त्यांना प्रभुरामाचा विसर पडला,आठवण करून देण्यासाठी प्रदेश भाजयुमोने खा. पवारांना १० लाख पत्र पाठविण्याचा संकल्प केला,म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातून २० हजार पत्रं पाठविण्यात येत आहेत.* *आता पर्यंत या मोहीमेत वरोरा तालुक्यातून २०००, भद्रावतीतून १०००, गोंडपिपरितून २०००, ब्रह्मपुरी तालुक्यातून१०००, नागभीड मधून २०००, राजुरा १०००,ज्ञकोरपना व जिवती येथून १००० सावली ५००, चंद्रपूर ग्रामीण १२००, बल्लारपूरातून१०००, चंद्रपुर महानगर व तालुक्यातून ४००० या प्रमाणे एकूण किमान १७००० पत्रं पाठवीण्यात आल्याची माहिती ब्रिजभूषण पाझारे यांनी दिली. तर यावेळी महापौर राखी कांचरलावार यांनी असे पत्र खा शरद पवार यांना रामभक्तांनी पाठवावे,असे आवाहन केले.*
यावेळी भाजयुमोचे रोशन खोब्रागडे, अनिकेत कंनाके, मयूर चहारे, सुजित चंद्रगुलवार, ईश्वर गावराने, मनीष पिपरे, राहुल पिदूरकर, अंकुश कोल्हे, सचिन संदूरकर, मनोज दुरतकर, ख्वाजाखान पठाण, बाळू कोल्हनकर, प्रवीण उरकुडे, रामजीत यादव, आकाश नैताम, राकेश बोलनकर, मयूर आक्केवार, महेश देवकते, बंडू गोहोकार यांची उपस्थिती होती. यावेळी मुख्य पोस्ट ऑफिस येथील पत्रपेटीत सर्व पोस्ट कार्ड पोस्ट करण्यात आली.