शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी आवश्यक शैक्षणिक कामासाठी प्रत्यक्ष शाळा, विद्यालय, महाविद्यालय मुख्यालयी कर्तव्यावर उपस्थित राहतील.
Bhairav Diwase. July 13, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- जिल्हयातील सर्व व्यवस्थापनाच्या अंतर्गत येत असलेल्या प्राथमिक, माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय तसेच कोचिंग क्लासेस दिनांक 31 जुलै पर्यंत बंद असणार आहे, याविषयीचा आदेश जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी जिल्ह्यात लागू केलेला आहे. परंतु शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी आवश्यक शैक्षणिक कामासाठी प्रत्यक्ष शाळा,विद्यालय,महाविद्यालय मुख्यालयी कर्तव्यावर उपस्थित राहतील.
चंद्रपूर जिल्हा कार्यक्षेत्रातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा टप्या-टप्याने सुरु करण्याबाबत स्थानिक परिस्थीतीचा विचार करुन, स्थानिक पातळीवरील प्रशासन, ग्राम पंचायत व शाळा व्यवस्थापन समिती यांनी एकत्रित निर्णय घेऊन शासन परिपत्रकातील वेळापत्रकानुसार तसेच आदेशाचे काटेकोरपने पालन करुन सुरु करण्याबाबत कार्यवाही करण्याकरिता निर्देश देण्यात आलेले आहे.
सदरील आदेशाचे पालन न करणारी,उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था, समुह यांनी साथरोग प्रतिबंधक कायदा 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तसेच भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188,269,270,271 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व नियमानुसार कारवाई करण्यात येईल.