नागभीड तालुक्यातील तळोधी(बा) मार्गावरी घटना.
Bhairav Diwase. July 13, 2020
नागभीड:- नागभीड़ तालुक्यातील येत असलेल्या तळोधी (बा) ते सिंदेवाही मार्गावरील कोजबी गावाच्या फाट्या जवळ पाऊस येऊ लागल्याने काही कामगार व्यक्ती चहा बंद टपरीवर थांबले होते. अचानक पाऊस, व विजेचा कडकाडक सह आवाज येताच झाडाखाली विश्रांती घेत थांबले होते.त्यात अशोक कवडू तिरमारे (४५ )रा वलनी,व लोकचंद रामू पोहनकर रा.सोनुली (१२) हे विजेच्या शाँकने जागीच ठार झाले तर चार जण जखमी झाल्याची घटना आज दुपारी तिन वाजता दरम्यान घडली आहे.
आज दुपारच्या सुमारात अचानक पाऊस येत असल्याने झाडाखाली विश्रांती घेत असताना झालेल्या प्रसंगाने त्या कुटुंबावर संकट कोसडले आहे यामुळे सर्व परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे इतर जख्मी व्यक्तीना नागभीड च्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असुन उपचार सुरु आहे.