Top News

बांधकाम अभियंता गायकवाड यांचेवर कारवाई करा:- सभापती विजय कोरेवार यांची तक्रार.

कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याने त्यांचेवर कारवाई करण्यासाठी सभापती विजय कोरेवार यांनी केली तक्रार दाखल.
Bhairav Diwase.    July 08, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कनिष्ट अभियंता गायकवाड यांचेकंडील कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याने त्यांचेवर कारवाई करण्यासाठी सभापती विजय कोरेवार यांनी तक्रार दाखल केली आहे.
     सावली तालुक्यातील पाथरी-व्याहाड खुर्द या क्षेत्रातील कामाची जबाबदारी कनिष्ठ अभियंता गायकवाड यांचेकडे आहे. मआगील चकविरखल जिल्हा परिषद शाळेचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार गावकऱ्यांनी केली त्यावेळेस सभापती कोरेवार यांनी ते काम बंद पाडले. झालेले काम दुसऱ्यांदा करण्यात आले परंतु त्यानंतर सदर कंत्राटदाराने काम ठप्प केले व आजच्या स्थितीत काम अपूर्ण आहे. भट्टीजांब व मोखाळा येथे बंदिस्त नालीचे बांधकाम करण्यात आले मात्र त्यावरील परशी सेंटरिंग लावून नकरता दुसरीकडे बनवून लावण्यात आली ते सुद्धा निकृष्ट दर्जाची असल्याने मोखाळ्याचे उपसरपंच संदीप जुनगरे यांनी काम बंद पाडले.  सायमारा येथे नाल्यावर साईड वॉल व काँक्रीट रोडचे काम करण्यात आले परंतु अल्पावधीतच 6 मिमी असलेले सळाख बाहेर पडले, गिट्टी निघायला लागली. अशी अनेक कामे गायकवाड यांच्या क्षेत्रातील निकृष्ट दर्जाची होत असल्याने त्यांचेवर कारवाई करण्यासाठी उप अभियंता, कार्यकारी अभियंता, पालकमंत्री यांचेकडे तक्रार केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने