वन विभागाकडून शेतकऱ्यांनवर होणारा नाहक त्रास सहन केला जाणार नाही:- मा रामपाल सिंग जिल्हा महामंत्री भाजपा जिल्हा चंद्रपूर.

Bhairav Diwase
मा आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात पाहणी करण्याकरिता मा.रामपाल सिंग जिल्हा महामंत्री भाजपा चंद्रपूर यांनी थेट शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन शेतकऱ्यांशी विचारपूस.
Bhairav Diwase.    July 08, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) राहुल बिसेन उर्जानगर, चंद्रपूर
चंद्रपूर:- ताडोबा बफर झोन अंतर्गत चंद्रपूर तालुक्यातील वलनी, बोर्डा, घंटा चौकी येथील शेकडो वर्षांपासून अनुसूचित जमातीचे  शेतकरी वडिलोपार्जित शेती करीत आहे. जमिनीचे पट्टे मिळण्यासाठी ते जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करीत आहे. जिल्हाधिकारी यांच्याकडे हा  विषय प्रलंबित आहे. मात्र वनविभागाचे अधिकारी  शेतकऱ्यांना शेती करीत असताना रोखण्याचा वर शेती उध्वस्त करण्याचा प्रयत्न करीत आहेत तसेच त्यांना मार झोड करण्याचा प्रयत्न देखील करीत आहे.त्या संदर्भात मा आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात पाहणी करण्याकरिता मा.रामपाल सिंग जिल्हा महामंत्री भाजपा चंद्रपूर यांनी थेट शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन शेतकऱ्यांशी विचारपूस केली. तसेच वनविभागाचा जाहीर निषेध केला. या वेळेस त्यांच्या सोबत मा. गौतमजी निमगडे जि.प.सदस्य चंद्रपूर, मा दयानंद बंकूवाले, मा दीपक खनके सरपंच बोर्डा यांची उपस्थिती होती.