चिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय त्वरित सुरू करा:-आ.बंटी भांगडीया

Bhairav Diwase

विभागीय आयुक्त नागपूर यांचेकडे प्रत्राद्वारे मागणी करत चिमूरच्या रक्तरंजित इतिहासाची करून दिली आठवन.

Bhairav Diwase.    July 08, 2020

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:-
चिमूर विधानसभा क्षेत्राच्या मुख्यालयी चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर येथे उप्पर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर झाले आहे.अप्पर जिल्हाधिकारी चिमूर या पदावर शासनाने दिनांक ३०/०४/२०२० रोजी च्या सुमारास शासकीय आदेशानुसार अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे परंतु समबंधीत अधिकाऱ्यांनी पदभार न स्वीकारल्यामुळे अद्यापही कार्यालय सुरू झाले नाही.

     कार्यालय लवकरात लवकर सुरू करण्यात यावे म्हणून चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडीया यांनी वारंवार पत्र व्यवहार केला असून काही दिवसांपूर्वी चिमूर-गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी सुद्धा पत्रव्यवहार केलेला आहे.तरी सुद्धा कार्यलय सुरू करण्यात आलेले नाही.त्यामुळे जनतेत रोष वाढत आहे,चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडीया यांनी विभागीय आयुक्त नागपूर यांना पत्राद्वारे संगीतले ही चिमूर ही क्रांतिभूमी आहे,या क्रांतिभूमीचा इतिहास अत्यंत रक्तरंजीत आहे त्यामळे येत्या ०९ आगस्ट२०२० पूर्वी चिमूर येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू न झाल्यास सम्पूर्ण जबाबदारी ही प्रशासनाची राहील.