डोंगरहळदीत पावसामुळे कोसळल घर. त्या कुटुंबाला दिली आर्थिक मदत.

Bhairav Diwase
0
आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली. कु अल्काताई आत्राम सभापती, सौ. ज्योतीताई बुरांडे उपसभापती, श्री गजानन गोरंटीवार भाजपा तालुकाध्यक्ष यांनी त्या कुटुंबाला यांच्या हस्ते आर्थिक मदत दिली. व जीवनावश्यक वस्तू ची किट.

गुरनुले कुटुंबीयांनी मानले आ. सुधीर भाऊंचे आभार
Bhairav Diwase.    July 08, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- पोंभुर्णा तालुक्यात रविवारी सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे डोंगर हळदी गावातील सोमवारी एका घराचा १ साईट भाग कोसळला. तर मंगळवारी २ साईटचा भाग कोसळला आहे. तर १ साईटची भिंत केव्हा कोसळेल सांगता येत नाही. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र घराचे प्रचंड आर्थीक नुकसान झाले. घरात ४ सदस्य राहत होते. त्यांची पत्नी, म्हातारी आई, व त्यांची ६ महीण्याची मुलगी राहत होते. 
          
          रविवार रात्री पासूनच जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू असतानाच पहाटेच्या सुमारास पावसामुळे बंडू मोतीराम गुरनुले यांच्या सोमवारी एका घराचा १ साईट भाग कोसळला. तर मंगळवारी २ साईटचा भाग कोसळला आहे. तर १साईटची भिंत केव्हा कोसळेल सांगता येत नाहीमात्र घरातील अन्नधान्य, कपडे, भांडे व इतर वस्तूं मातीच्या ढिगारात सापडल्याने मोठे नुकसान झाले आहे. 
            
          या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सौ ज्योतीताई बुरांडे उपसभापती पंचायत समिती पोंभुर्णा, श्री कंकुलवार तलाठी, श्री कळसकर ग्रामसेवक चेक हत्तीबोडी यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला. सौ ज्योतीताई बुरांडे उपसभापती पंचायत समिती पोंभुर्णा यांनी दुरध्वनी व्दारे आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना घडलेली घटना सांगितली. व घटनेबद्दल सविस्तर चर्चा केली. आणि त्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याचे आश्वासन सौ ज्योतीताई बुरांडे यांनी दिले. 
             
        सौ. ज्योतीताई बुरांडे उपसभापती पंचायत समिती पोंभुर्णा यांनी त्या कुटुंबाला काल भेट दिली होती. कालच आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या सोबत दुरध्वनी व्दारे संपर्क साधला. आणि त्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळवून देणार असे आश्र्वासन सौ. ज्योतीताई बुरांडे यांनी दिली होती. व आज त्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळवून दिली. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली. कु अल्काताई आत्राम सभापती पंचायत समिती पोंभुर्णा, सौ. ज्योतीताई बुरांडे उपसभापती पंचायत समिती पोंभुर्णा, श्री गजानन गोरंटीवार भाजपा तालुकाध्यक्ष पोंभुर्णा यांच्या हस्ते त्या कुटुंबाला आर्थिक मदत दिली. व जीवनावश्यक वस्तू ची किट देण्यात आली. गुरनुले कुटुंबानी आ. सुधीर भाऊंचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)