Top News

विद्यार्थ्यांची शाळेला वृक्षांची भेट.

वृक्षारोपण करतांना सतीश बिडकर, संतोष उपरे यांच्यासह या कॉन्व्हेंट शाळेचे सर्व शिक्षक वृंद उपस्थित.
Bhairav Diwase.    July 08, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथील किडझी या कॉन्व्हेंट शाळेच्या संचालिका स्नेहल संतोष उपरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संकल्प सतीश बिडकर यांनी वृक्षांची भेट दिली. विशेष म्हणजे वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांनी दिलेल्या या वेगवेगळ्या वृक्षांचे रोपण शाळा परिसरात करण्यात आले. अत्यन्त कमी वर्षात किडझी शाळेचें नाव परिसरात नावारूपास आले. तेथील शिक्षण विद्यार्थ्यांना खूप सोपी असल्याने व शिक्षकांची विद्यार्थ्यांन मध्ये शिकण्याची  गोळी निर्माण करण्यात सर्व शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे.          विद्यार्थी या शाळेत ऍक्टिवटी जास्त प्रमाणात शिकवितात त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकताना कोणतीही अडचण येत नाही उलट विद्यार्थी शाळेत जाणे, अध्यास करणे, जेवण सुद्धा व्यवस्थित करणे याकडे पूर्ण पणे शिक्षकांचे लक्ष अस्तातसे विद्यार्थ्यांचे पालक सतिश बिडकर यांनी सांगितले. यावेळी सतीश बिडकर, संतोष उपरे यांच्यासह या कॉन्व्हेंट शाळेचे सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने