जि. प. अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांची प्रा. आ. केंद्र अंतरगाव येथे सदिच्छा भेट.

वैद्यकीय अधिकार्‍यांना दिले. यासोबतच त्यांनी आरोग्य केंद्राच्या इमारतीचीही संपूर्ण पाहणी केली. आणि उपस्थित आशा वर्कर्स यांना शुभेच्छा देत त्यांच्या कामाचे कौतुक केले.
 Bhairav Diwase.    July 08, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- जिल्ह्यात दिवसागणिक वाढत चाललेल्या कोरोणा संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर जि. प. अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांनी सावली तालुक्यातील अंतरगाव प्रा. आ. केंद्राला सदिच्छा भेट दिली.
याठिकाणी उपस्थित असलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मस्के यांचेकडून स्थानिक आरोग्यासंबंधी अनेक विषयांसह कोरोणा महामारीच्या काळात स्थानिक पातळीवर चालवलेल्या आरोग्य सुविधा आणि आशा वर्कर्स यांचे घरोघरी करण्यात येत असलेल्या पंधरवाडी सर्वेची त्यांनी सविस्तर माहिती घेतली. ज्यामधे मागे बाहेरून आलेल्या ११ व्यक्तींना गृहविलगीकरण करण्यात येऊन त्यांचे नमुने निगेटिव्ह आल्याचे डॉ. मस्के यांनी सांगितले. तसेच प्रा. आ. केंद्रात उपलब्ध औषधी, सॅनिटायझर व मॉस्क यांविषयी त्यांनी माहिती घेतली. शिवाय पावसाळ्याच्या दिवसांत परिसरात साथीच्या रोगांचा उद्रेक होऊ नये याकरिता खबरदारी घ्यावी आणि नागरिकांत जनजागृती करावी. असे निर्देश त्यांनी यावेळी वैद्यकीय अधिकार्‍यांना दिले. यासोबतच त्यांनी आरोग्य केंद्राच्या इमारतीचीही संपूर्ण पाहणी केली. आणि उपस्थित आशा वर्कर्स यांना शुभेच्छा देत त्यांच्या कामाचे कौतुक केले. यावेळी त्यांसमवेत जि. प. सदस्या सौ. योगीताताई डबले, उपअभियंता (बां.) गोंगले, सामाजीक कार्यकर्ते पुनम झाडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. मस्के, औषध निर्माण अधिकारी मारोती चव्हाण, आरोग्य सहाय्यक तसेच परीसरातिल आशांसह प्रा. आ. केंद्राचे इतर कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत