Top News

सावली तालुक्यातील रुद्रापूर येथे कृषी संजीवनी सप्ताह कार्यक्रमांतर्गत निंबोळी अर्क तयार करण्याबाबत दाखविले प्रात्यक्षिक.

कृषी पदवीधर संघटनेचे सावली तालुका सचिव कृषीमित्र जितेंद्र आनंदराव बोरकुटे यांनी मार्गदर्शन केले.
Bhairav Diwase.    July 10, 2020
   
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- तालुक्यातील रुद्रापूर येथे ७ जुलै २०२० रोजी कृषी संजीवनी सप्ताह कार्यक्रमांर्गत निंबोळी गोळा करून त्यांचे निंबोळी अर्क कसा तयार करतात याबाबत प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. कृषी पदवीधर संघटनेचे सावली तालुका सचिव कृषीमित्र जितेंद्र आनंदराव बोरकुटे यांनी मार्गदर्शन केले. तसेच कृषीमित्र तथा तालुका स्थायी समितीचे सदस्य वामन श्रीराम बोरकुटे यांनी सेंद्रीय शेतीविषयी मार्गदर्शन केले. कमी खर्चात जास्त उत्पन्न कसा घेता येईल याबाबतही यावेळी सांगण्यात आले. यावेळी गावातील नागरिक, शेतकरी, महिलांची उपस्थिती होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने