Top News

पं.स सदस्य विनोद देशमुखांचा कुपोषण निर्मूलनाचा प्रयत्न प्रेरणादायी.

मा.सुधीर मुनगंटिवार यांच्या वाढदिवसानिमीत्य कुपोषितांना पोषण आहार वितरित.
Bhairav Diwase.    July 30, 2020

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- कुपोषन निर्मूलन ही काळाची गरज आहे.यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे.अशावेळी समाजाचा एक घटक म्हणून.माजी अर्थमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्य पोंभुरणा पंचायत समितीचे सदस्य विनोद देशमुख यांनी कुपोषण निर्मूलनासाठी पुढाकार घेतलेला उपक्रम निश्चितच प्रेरणादायी आहे.असे मत सामाजिक कार्यकर्ते सुरज माडूरवारांनी व्यक्त केले.
चंद्रपूर जिल्ह्यात विस्तार अधिकारी अमित महाजनवार यांच्या मार्गदर्शनात कुपोषण निर्मूलनासाठी काम करणाऱ्या राजुरा येथील बाळू या संस्थेच्या माध्यमातून आमदार मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्य गोंडपीपरी येथील २ बालकांच्या सकस आहाराचा विडा देशमुखांनी उचलला आहे.याअंतर्गत त्यांना नियमित कुपोषण निर्मूलनासाठी आवश्यक तेवढा आहार पुरवठा केला जाणार आहे.असा संकल्प विनोद देशमुख यांनी केला आहे.राजुरा येथील 'बाळू' be a part of loving yunit ही संस्था बालकांच्या कुपोषण निर्मूलनासाठी काम करीत आहे.गोंडपिपरी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते सुरज माडूरवार यांनी या संस्थेच्या नाविन्यपूर्ण उपक्रमा संदर्भातील अधिक माहिती देशमुखांना अवगत करून दिली.लागलीच माजी अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाचे अवचित्य साधत पं. स सदस्य देशमुख यांनी हा सामाजिक जाणिवेचा उपक्रम करण्याचा संकल्प केला. या उपक्रमात २ कुपोषित बालकांना सकस आहाराची किट देण्यात आली.यावेळी उपसरपंच मोहन चुदरी,सामाजिक कार्यकर्ते अनिल सुरकर,अंगणवाडी सेविका रोशनी देवगडे, बाळू संस्थेचे सदस्य सुरज माडूरवार उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने