पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत व म्हाडा अंतर्गत लाभार्थींना घरकुल देण्यासंदर्भात आयोजित बैठकीत सकारात्मक निर्णय.
Bhairav Diwase. July 24, 2020
धानोरा (गडचिरोली जिल्हा):- धानोरा येथील घरकुल योजनांची कामे लवकरच पूर्ण होण्यासाठी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत लाभार्थींना घरकुल देण्यासंदर्भात व म्हाडा अंतर्गत घर देण्याबाबत नगर पंचायत धानोरा येथे बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली त्यानुसार आता धानोरा येथील घरकुल योजनांची कामे लवकरच पूर्ण होणार असल्याचे आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनी म्हटले आहे
आमदार डॉ देवरावजी होळी यांच्या सूचनेवरून मुख्याधिकारी नगर पंचायत धानोरा यांनी आयोजित केलेल्या या बैठकीला नगराध्यक्षा सौ लिनाताई साळवे, उपाध्यक्ष बाळू उंदिरवाडे, मुख्यधिकारी नगर पंचायत धानोरा, भूमि अभिलेख अधिकारी, वन विभागाचे अधिकारी, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत कार्यरत यंत्रणा व संबंधित अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते