Top News

शंकरपूर-डोमा जिल्हापरिषद क्षेत्रांतील प्रथम कन्यारत्न कुटुंबाला धनादेश वाटप.

आमदार बंटी भांगडीया यांचा लोकपयोगी उपक्रम.
Bhairav Diwase.    July 24, 2020
(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी भांगडीया फाउंडेशन च्या माध्यमातून प्रथम कन्या झालेल्या लाभार्थ्यांना 5 हजार रुपये धनादेश देऊन  पुढील 23 वर्षात 40 हजार रुपये लग्न कार्या साठीची लोकोपयोगी योजना अंमलात आणली आहे .
      स्व धापुदेवी गोटुलालजी भांगडीया स्मृती प्रित्यर्थ प्रथम कन्या झालेल्या लाभार्थ्यांना 5 हजार रुपयांचा धनादेश वाटप अविनाश बारोकर यांचे हस्ते देण्यात आले .
     यावेळी जेष्ठ नेते बंडूभाऊ  नाकाडे सुरज नरुले प्रशांत चिडे  संजय कुंभारे गजू राऊत पत्रकार गणपत खोबरे आदी उपस्थित होते .
     अरुण लोहकरे, नाजीया शेख यांनी धनादेश वाटपाचे काम पाहिले. शंकरपूर जिल्हा परिषद क्षेत्रातील  11 लाभार्थ्यांना धनादेश वाटप करण्यात आले .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने