जि. प. अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांनी दिली जिबगाव प्रा. आ. केंद्राला सदिच्छा भेट.

Bhairav Diwase
कोरोणा महामारीचे संक्रमण जिल्ह्यात वाढत चालल्याने नागरिकांना आरोग्याची काळजी  घेण्यासाठी जनजागृती करा:- जि. प. अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले.
Bhairav Diwase.    July 02, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- दि. ०१ जुलैला जि. प. अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांनी सावली तालुक्यातील जिबगाव प्रा. आ. केंद्राला जिल्ह्यात कोरोणा महामारीच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर सदिच्छा भेट दिली.
आणि मुख्यालयीन असलेल्या औषध निर्माण अधिकारी श्री सुरज मेश्राम यांचेशी स्थानिक आरोग्यासंबंधी अनेक विषयांवर चर्चा करत अनेक सूचना केल्या. ज्यामधे प्रा. आ. केंद्रातील परिसर स्वच्छ ठेवण्यात यावा. केंद्राच्या इमारतीचे दारे व खिडक्या मोडकळीस आल्या आहेत त्यांचे रुग्ण  कल्याण समितीमार्फत दुरुस्त्या करा.          तसेच भांडारही व्यवस्थित ठेवण्यात यावा. आणि सद्यस्थितीत कोरोणा महामारीचे संक्रमण जिल्ह्यात वाढत चालल्याने नागरिकांना आरोग्याची काळजी  घेण्यासाठी जनजागृती करा. असे निर्देश त्यांनी उपस्थित औषध निर्माण अधिकारी यांना दिले. त्यावेळी उपस्थित राकेश गोलेपल्लीवार सामाजिक कार्यकर्ते सह आदीची उपस्थित होते.