जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, माजी आमदार अतुल देशकर, भाजपा नेते राजेंद्र गांधी, संघटन महामंत्री संजय गजपुरे यांची उपस्थिती.
Bhairav Diwase. July 02, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- महाराष्ट्राचे माजी वन मंत्री मा.आम.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून व भाजपा प्रदेश महामंत्री आ.रामदासजी आंबटकर, खासदार अशोक नेते यांच्या वाढदिवसानिमित्त ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. या वृक्षारोपण कार्यक्रमाला ब्रम्हपुरी विधानसभेचे माजी आमदार प्रा.अतुल देशकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, जेष्ठ नेते राजेंद्र गांधी व भाजपा जिल्हा संघटन महामंत्री संजय गजपुरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
मागील ५ वर्ष महाराष्ट्राचे वन मंत्री असतांना मा.आम.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून हरीत महाराष्ट्राच्या दृष्टीने संपूर्ण राज्यात मागील ५ वर्षात ५० कोटी हुन अधिक वृक्षांची लागवड करणयात आली होती. हीच परंपरा कायम राखत मा.आम.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून आज भारतीय जनता पार्टी चंद्रपूर जिल्ह्याच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात वृक्षरोपण करण्यात आले.
ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात क्षेत्राचे माजी आमदार प्रा.अतुल देशकर यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रम्हपुरी तालुक्यातील मेंडकी येथे जेष्ठ कार्यकर्ते अरुण शेंडे, सरपंच यशवंत आंबोरकर यांच्या हस्ते व भुज येथे भाजप तालुका महामंत्री माणिक थेरकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. सिंदेवाही तालुक्यातील पळसगाव जाट येथे भाजपा जिल्हा संघटन महामंत्री यांनी वृक्षारोपण केले तर सिंदेवाही येथे भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. सावली तालुक्यातील कापसी येथे क्षेत्राचे माजी आमदार प्रा.अतुल देशकर यांनी वृक्षारोपण केले तर सावली येथे भाजपचे नेते राजेंद्र गांधी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. सावली तालुक्यातील पाथरी येथे जि.प चंद्रपूरचे समाजकल्याण सभापती नागराज गेडाम यांनी वृक्षारोपण केले.
या वृक्षारोपण कार्यक्रमाला सावली येथे जि.प चे माजी सभापती संतोष तंगडपल्लीवार, सावली तालूका भाजपाचे अध्यक्ष अविनाश पाल, महामंत्री सतीश बोम्मावार, महामंत्री दिलीप ठिकरे, भाजपा शहर अध्यक्ष चंद्रकांत संतोषवार, जेष्ठ कार्यकर्ते प्रकाश गड्डमवार, सोशल मीडिया प्रदेश कार्यकारिणी सदस्य राकेश कोंडबत्तूंवार तर सिंदेवाही येथे जि.प सभापती नागराज गेडाम, प्रा.गोपीचंद गणवीर, कमलाकर सिद्धमशेट्टीवार, भाजपा शहर अध्यक्ष दिवाकर पुस्तोडे, माजी नगर पंचायत अध्यक्ष श्रीमती. मोहिनीताई गेडाम, माजी उपाध्यक्ष हितेश सूचक, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष रितेश अलमस्त यांच्या सह अनेक भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.