Top News

मुल शहरात पुन्हा पाच कोरोना बाधीत.

शहरात आज आणखी पाच कोरोणा बाधीत रूग्णाची नोंद.
Bhairav Diwase.    July 24, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) संजय मेकर्तीवार, मुल
मुल:- शहरात आज आणखी पाच कोरोणा बाधीत रूग्णाची नोंद झाली असून, हे चारही बाहेर राज्यातून मूल येथील राईस मील मध्ये मजूरी करण्यासाठी आलेले आणि संस्थात्मक विलगीकरणात असलेले आहे.

65 परप्रांतीय मजूर शहरात राईस मील मध्ये मजूरी करण्यासाठी मूल येथील एका स्थानिक मजूर कंत्राटदाराचे माध्यमातून दाखल झाले होते. या मजूरांना प्रशासनाने राईस मील मध्ये गृह विलगीकरणात ठेवले होते. यातील मजूर मोठया प्रमाणावर कोरोणा पॉझिटिव्ह निघाल्यांने, शहरात चिंतेचे आणि भितीचे वातावरण निर्माण झाले. या मजूरांच्या संपर्कात आलेला मूल येथील एक इसमालाही कोरोणाची बाधा झाली असल्यांने, या मजूरांचा स्थानिक नागरीकांसोबत संपर्क आल्यांचे स्पष्ट झाले. आज आणखी काही मजूरांचे स्वॅब तपासणी अहवाल तालुका आरोग्य प्रशासनास प्राप्त झाले, त्यातपाच मजूरांचा अहवाल कोरोणा पॉझिटिव्ह आल्यांने, प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. ज्या ट्रॅव्हल्स मध्ये ३५ मजूर एकत्र आले होते, त्यातील आतापर्यंत २९ मजूर पॉझिटिव निघाले आहेत

मिळालेल्या विश्वसनीय माहीतीनुसार, ३५ मजूर हे एकाच ट्रॅव्हल्समध्ये प्रवास करून आले. एका ट्रॅव्हल्समध्ये एवढे मजूरांना आणण्याची परवाणगी कुणी दिली हा आता तपासाचा विषय झाला आहे.  गृह विलगीकरणात असलेल्या मजूरांची राईस मील मालकांवर जबाबदारी असतांना, त्यांचा शहरातील नागरीकांचा संबध आल्यांचे स्पष्ट झाल्यानंतही, या मील मालकांवर कोणतीच कारवाई का केल्या जात नाही?  असाही प्रश्न नागरीकांत चर्चेला जात आहे.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने