Top News

युवकांना पोलिसांसोबत काम करण्याची अनोखी संधी:- जिल्हा पोलीस अधीक्षक रेड्डी ह्यांची माहिती.

महानगरात 17 ते 26 जुलै पर्यंत 2 टप्पात लाॅकडाऊन.
Bhairav Diwase.    July 17, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. जिल्ह्यातील बाधितांची संख्या 200 च्या पुढे गेली असुन चंद्रपूर महानगरात आतापर्यंत 100 पेक्षा जास्त बाधित आढळून आले असल्याने प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने चंद्रपूर महानगरात 17 ते 21 जुलै पर्यंत संपुर्ण लॉक डाऊन जाहिर केले असुन सकाळी दूध विक्रेते तसेच वैद्यकीय सेवा सुरू राहणार असुन इतर जिवनावश्यक वस्तूंची दुकाने बंद राहणार आहे. ह्या काळात केवळ शासकीय, निमशासकीय कर्मचार्‍यांना केवळ कार्यालयीन कामकाजासाठी बाहेर पडण्याची मुभा देण्यात आली आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी जनतेसाठी दिलेल्या व्हिडिओ संदेशात ह्या संदर्भातील माहिती देताना सांगितले की, नागरिकांनी ह्या लॉक डाऊन च्या काळात अनावश्यक बाहेर पडु नये. कलम 144 लागु असल्याने कुणीही संचारबंदीचे उल्लंघन केल्यास प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल आणि त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील कलम 188 अन्वये देखिल कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी बजावले आहे.

ह्याखेरीज शहराच्या हद्दीतील सर्व रस्ते बंद करण्यात येणार असुन काल रात्री 12 वाजल्यापासून ह्याची अंमलबजावणी केली जाणार असुन योग्य कारणाशिवाय बाहेरुन शहरात येणारी वाहने अडविण्यात येणार आहे. शहरातील प्रत्येक गल्लीबोळात गस्त घालण्यात येणार असुन रस्त्यावर विनाकारण धावणारे वाहन जप्त करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.


ह्याशिवाय पोलीस यंत्रणेवर पडलेला ताण कमी करण्यासाठी युवकांना पोलिसांसोबत काम करता येणार असुन पोलीस कर्मचाऱ्यांसह ह्या युवकांची पोलीस योद्धा म्हणुन विविध ठिकाणी तैनाती करण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी ह्यांनी जाहिर केले. ज्या युवकांना पोलिसांसह  पोलीस योद्धा म्हणुन काम करून राष्ट्रीय कार्यात आपले योगदान द्यायचे असेल त्यांनी महाराष्ट्र पोलीस विभागाच्या वेबसाईट वर जाऊन चंद्रपूर जिल्ह्यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. 


पोलिस योद्धा - चंद्रपूर पोलीस

पोलीसांसोबत पोलीस योद्धा म्हणून १५ दिवस सेवा बजावुन योगदान द्यावे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने