Top News

आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या जन्मदिनानिमित्त राजुरा तालुक्यातील कढोली प्रा. आ. केंद्रात आशा वर्कर्सना अन्नधान्य कीटचे वाटप.

Bhairav Diwase. July 31, 2020


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- राज्याचे माजी अर्थ व नियोजन तथा वनेमंत्री, जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, लोकनेते आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज जि. प. अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांनी राजुरा तालुक्यातील प्रा. आ. केंद्र कढोली येथे सेवा देणार्‍या आशा वर्कर्सना अन्नधान्याच्या कीटचे वाटप केले.
संपूर्ण जग कोरोणा महामारीच्या जागतिक संकटाला लढा देत असतांना आशांनी कोरोणा योद्धे बनून आरोग्य सेवा दिली व देत आहेत. त्यांच्या या सेवाकार्याची दखल घेऊन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जि. प. अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांनी जिल्ह्याचे लोकनेते आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत कोरोणा योद्धे ठरलेल्या आशांना छोटीशी भेट वस्तु म्हणून आज जिल्ह्यात अनेक ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी देऊन तेथे सेवेत असलेल्या आशा वर्कर्सना अन्नधान्याच्या किटचे वाटप केले.
यावेळी, आशा भगिनींच्या उदात्त सेवाव्रताचे कौतुक करतांना, दिवसेंदिवस जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही शिरकाव करत चाललेल्या कोरोणा विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात नागरिकांच्या मनात भयग्रस्त चित्र तयार होत आहे. परंतु अशा परिस्थितीतही नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्वतोपरी खबरदारी घेण्यासाठी तुम्ही आशाभगिनी रात्रंदिवस सेवा देता, नागरिकांच्या घरोघरी जावून स्वतः माहिती घेता व आरोग्य विभागाला सहकार्य करता या तुमच्या धाडसी सेवावृत्तीचा आम्हाला अभिमान वाटतो. अल्पशा मानधनातही राष्ट्रीय सेवा देण्याचे काम तुम्ही करता याचे कौतुक करता यावे, तुमच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करता यावी. यासाठी आदरणीय भाऊंच्या
जन्मदिवसाचे औचित्य साधून मी तुम्हाला भेटण्यासाठी, तुमचा गौरव करण्यासाठी इथे आली आहे. असे प्रतिपादन जि. प. अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांनी केले. 
यासोबतचं सभापती सुनील उरकुडे यांनी आपल्या समारोपीय भाषणात आशांना त्या करत असलेल्या मानवतावादी सेवेची जाणीव करून दिली. आणि वाईट कामे करणार्‍याला जसे धाक दिले जाते, अगदी त्याचप्रमाणे चांगले कामे करणार्‍याला शाबासकी दिली जाते, चांगल्याचे गौरव व मानसन्मान केले जाते, आणि आज आपण या महामारीच्या लढ्यात सेवा देत वठवलेली महत्वपूर्ण भूमिका निश्चितच कौतुकास्पद आहे. आणि त्यामुळेचं आज तुमच्या कार्याचे गौरव होत आहे. असे ते म्हणाले. 
यावेळी मंचावर, कृषि व पशुसंवर्धन सभापती सुनीलभाऊ ऊरकुडे, सरपंचा रसिका पडवेकर, वामनराव तुरानकर, शत्रुघ्न पेटकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. विपिन उबेला, आरोग्य सहाय्यक चिढे, शास्त्रकार, पाउणकर, कुंभारे, कोटनाके, गुरनुले यांसह स्थानिक पदाधिकारी व आशा वर्कर्स मोठ्या संख्येत उपस्थित होत्या.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने