Top News

संबंधित पालकांनी त्या बालिकेवर हक्क दाखवावा. अन्यथा त्या बालिकेला दत्तक मुक्त घोषित करण्यात येणार.

Bhairav Diwase.   July 31, 2020

(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- पोलीस स्टेशन, चंद्रपुर येथे दि. 29 फेब्रुवारी 2020 रोजी तक्रार प्राप्त झाली की सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे एका अनोळखी महिलेने एका नवजात बालिकेला एका अनोळखी व्यक्ती जवळ ठेवून तिथून पसार झाली. त्या नवजात बालिकेला पोलिसांनी शासकीय मेडिकल कॉलेज व रुग्णालय चंद्रपूर येथील एनआयसीयु वार्ड मध्ये दाखल केले असून त्या नवजात बालिकेची प्रकृती चांगली झाल्यानंतर तिला रुग्णालयातून दि. 2 मार्च 2020 रोजी सुटी देण्यात आली. पोलिसांनी सदर नवजात बालिकेला दि. 2 मार्च 2020 रोजी दुपारी 1 वाजता महिला विकास मंडळद्वारा संचालित किलबिल प्राथमिक बालगृह-दत्तक योजना, चंद्रपूर यांच्याकडे बालिकेचा ताबा देऊन दाखल करण्यात आले. सदर बालिकेबाबत संबंधित पालकांनी हक्क दाखवावा अन्यथा बाल कल्याण समिती, चंद्रपूर त्या बालिकेला दत्तक मुक्त घोषित करेल आणि महिला विकास मंडळ द्वारा किलबिल संस्था दत्तक देण्याच्या प्रक्रियेची सुरुवात करील, असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण कक्ष चंद्रपूर यांनी केले आहे.

संस्थेने त्या बालिकेचे नाव संस्थेच्या दप्तरी उमा असे नोंदवून दि.2 मार्च 2020 रोजी बाल कल्याण समिती चंद्रपूर येथे उमा नामक बालिका दाखल झाल्याबाबत पत्राद्वारे कळविले. बालकल्याण समिती चंद्रपूर मार्फत केस नं 34/2020 दि. 2 मार्च 2020 च्या आदेशाने सदर उमा बालिकेचा ताबा महिला विकास मंडळद्वारा संचालित किलबिल प्राथमिक बालगृह दत्तक योजना, चंद्रपूर येथे चालू ठेवला आहे.

तरी बालिकेच्या संबंधित पालकांनी सात दिवसाच्या आत बाल कल्याण समिती, शासकीय मुलांचे निरिक्षण गृह- बालगृह, डॉ. राजेंद्र आल्लूरवार बिल्डींग, सी-18, शास्त्रीनगर बगीच्या जवळ शास्त्रीनगर, चंद्रपूर किंवा जिल्हा बाल संरक्षण कक्षद्वारा जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालय, जुना कलेक्टर बंगला, जिल्हा स्टेडियम जवळ, चंद्रपूर, किंवा महिला विकास मंडळ द्वारा संचालित किलबिल प्राथमिक बालगृह-दत्तक योजना, डॉ. मुठाळ यांच्या जुन्या दवाखान्याजवळ, रामनगर चंद्रपूर या पत्त्यावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने