Top News

पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार 31 जुलै शुक्रवार व 1 ऑगस्ट शनिवार रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर.

31 जुलै रोजी सिंदेवाही येथील गावातील नागरिकांशी साधणार संवाद.

1 ऑगस्टला ब्रह्मपुरी येथे कोरोना विषयक आढावा बैठक.
Bhairav Diwase.   July 31, 2020

(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास, बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार दिनांक 31 जुलै शुक्रवार व 1 ऑगस्ट शनिवार रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.

31 जुलै शुक्रवार रोजी सकाळी 9 वाजता कमलाई निवास रामदास पेठ नागपूर येथून सिंदेवाही जिल्हा चंद्रपूर कडे प्रयाण करतील. सकाळी 11 वाजता देवयानी इंटरनॅशनल स्कूल सिंदेवाही येथे काँग्रेस कार्यकर्त्या बरोबर बैठक घेणार आहेत. दुपारी 12 वाजल्यापासून सिंदेवाही तालुक्यातील अनुक्रमे वासेरा, पिंपरदेरी,पांढरवाणी, कारवा, शिवणी, सिरकडा या गावाला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधतील. सायंकाळी 6 वाजता सिरकडा गावातून ब्रह्मपुरी कडे प्रयाण करतील. तर सायंकाळी 7:30 वाजता शासकीय विश्रामगृह ब्रह्मपुरी येथे आगमन होऊन त्यांचा मुक्काम असणार आहे.

1 ऑगस्ट शनिवार रोजी सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह ब्रह्मपुरी येथे कोविड-19 बाबत आढावा बैठक घेणार आहेत. दुपारी 2 वाजता शासकीय विश्रामगृह ब्रह्मपुरी येथे काँग्रेस कार्यकर्त्यांबरोबर बैठक घेणार आहेत. सायंकाळी 4 वाजता शासकीय विश्रामगृह ब्रह्मपुरी येथून नागपूर कडे प्रयाण करतील तर सायंकाळी 6 वाजता कमलाई निवास रामदासपेठ नागपूर येथे आगमन होऊन त्यांचा मुक्काम असणार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने