Top News

आ श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार विकास पुरुष यांचा वाढदिवस लोकोपयोगी कार्यातून साजरा.

कोरपना तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने सेवादिन म्हणून साजरा.
Bhairav Diwase.    July 30, 2020




(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- कोरपना तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आ श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार विकास पुरुष यांचा वाढदिवस सेवादिन म्हणून साजरा करण्यात आला आज 30 जुलै रोज गुरुवारला तहसील ऑफिस कोरपणा येथे वृक्षारोपण करण्यात आले तसेच कोरपना येथील ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले हा कार्यक्रम श्री नारायण हिवरकर भाजपा अध्यक्ष तालुका कोरपना यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती श्री डॉक्टर गायकवाड साहेब,कवडू पाटील जरीले,श्री अरुण मळावी सरपंच,श्री पुरुषोत्तम भोंगळे,श्री किशोरजी बावणे,श्री शशिकांत अडकिने,श्री अनिल कवरासे,श्री दिनेश खडसे,श्री यशवंत इंगळे,श्री कुमरेजी,श्री मनोज तुमराम,कोहचाळे,श्री विनायक जिवतोडे,श्री निवृत्ती डोहे,श्री प्रवीण भोयर,श्री सुधाकर कव्वलवार,श्री दिवाकर गेडाम आदी पदाधिकारी कार्यकर्ते कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते तालुका अध्यक्ष ् नारायण हिवरकर यांनी मा ना आ श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार लोकनेते विकास पुरुष यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या व उदंड आयुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले नियमाच्या अधीन राहून हा कार्यक्रम साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे संचालन पुरुषोत्तम भोंगळे यांनी केले तर आभार शशिकांत आडकीने यांनी मानले कार्यक्रमाला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने