सावली शहर अध्यक्ष पदी आशिष जी कार्लेकर यांची एकमताने निवड.

व्याहाड खुर्द नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष देवराव दादा भोंगळे व जिल्हा महामंत्री संजयजी गजपुरे यांच्या मार्गदर्शनात सावली तालुका पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. यात सावली शहर अध्यक्ष पदी आशिष अशोकराव कार्लेकर यांची निवड झाल्याची घोषणा.
Bhairav Diwase.    July 10, 2020
   
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- सावली शहरात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत सावली शहर अध्यक्ष पदी आशिष अशोकराव कार्लेकर यांची एकमताने निवड करण्यात आली. या बैठकीला सावली तालुका महामंत्री सतिशजी बोम्मावार, जेष्ठ नेते प्रकाशजी खजांची, अशोकजी आकुलवार, कृष्णाजी राऊत, अतुलजी लेनगुरे, गुरुदासजी कोसरे, राकेशजी कोंडबतूनवार, गौरवजी संतोषवार, राकेशजी विरमलवार, मनोजजी अमरोजवार,सुदर्शनजी चमलवार, राहुलजी लोडेल्लीवार, इम्रानजी शेख, मयूरजी व्यास, प्रसाद जक्कुलवार, राहुलजी मेरुगवार, बुट्टे साहेब, मानसीताई लाटेलवार, अविनाश चल्लावार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

           यानंतर व्याहाड खुर्द नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष देवराव दादा भोंगळे व जिल्हा महामंत्री संजयजी गजपुरे यांच्या मार्गदर्शनात सावली तालुका पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. यात सावली शहर अध्यक्ष पदी आशिष अशोकराव कार्लेकर यांची निवड झाल्याची घोषणा जिल्हा अध्यक्ष देवराव दादा भोंगळे यांनी केली.
माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार, मा.खासदार अशोकजी नेते, माजी आमदार अतुलभाऊ देशकर, तालुका अध्यक्ष अविनाशजी पाल, तालुका महामंत्री सतिशजी बोम्मावार, संतोष सावकार तंगडपल्लीवर जि.प.सदस्य, जि.प.सदस्य मनिषाताई चिमुरकर, योगिताताई डबले, रवींद्रजी बोलीवार पं.स.उपसभापती, प.स.सदस्य गणपत जी कोठारे, विनोदजी धोटे भाजयुमो तालुका अध्यक्ष, दिलीपजी ठिकरे, दौलत भोपये, प्रकाशजी गड्डमवार, अर्जुन भोयर,अरुनजी पाल, पुष्पाताई शेरकी अध्यक्ष महिला आघाडी, आदी पदाधिकाऱ्यांनी नवनियुक्त शहर अध्यक्षाचे अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत