45 वर्षीय आरोपीस अटक.
Bhairav Diwase. July 18, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- सावली तालुक्यातील पाथरी येथे आजच्या सुसंस्कृत समाजातील महाराष्ट्रामध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना काल शुक्रवार रोजी अंदाजे 05.30 वाजता सायंकाळच्या सुमारास घराशेजारी 45 वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली .
अडीच वर्षाची चिमुकली बाहेर खेळायला गेली असता आरोपी जितेंद्र रामदास मेश्राम (वय 45 वर्ष) याने चने देण्याच्या बहाण्याने घरी नेऊन तिच्यावर क्रूर अत्याचार केला. ती रडत असल्याने तिच्या आईने चौकशी केली असता त्यानुसार फिर्यादीने मुलीवर अत्याचार झाल्याचे लक्षात येताच त्याने ग्रामीण रुग्णालय सावली येथे नेले असता तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या अभिप्रायावरून त्यांना जाणीव झाली की, तिच्यावर क्रूर अत्याचार झाला. त्यावरून फिर्यादीने पोलीस स्टेशन पाथरी येथे आरोपी जितेंद्र रामदास मेश्राम (वय 45 वर्ष) रा. पाथरी याच्यावर कलम 376, अ, ब सह कलम 4,6,10 पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर पोलीस स्टेशन पाथरी यांनी दोन पथक तयार करून आरोपीचे शोध घेऊन आरोपीस तात्काळ अटक करून गुन्हा नोंद केला असून उपविभाग मूल, येथून तपास पथक हजर होऊन माननीय पोलिस अधीक्षक चंद्रपूर, उपविभागीय पोलीस अधिकारी मूल, तसेच ठाणेदार योगेश घारे यांचे मार्गदर्शनात सपोनी पारधी मॅडम, यांच्याकडे तपास देण्यात आला. सदर गुन्ह्याचा अधिक तपास पारधी मॅडम करीत आहेत.
या घटनेची माहिती होताच संपूर्ण गावात तीव्र पडसाद उमटले लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधामास कठोर शिक्षा देण्यात यावे अशी मागणी सर्व पाथरीवासीय नागरिक करीत आहेत.