बैठक, अमृत कलश योजनेचा घेतला आढावा.
Bhairav Diwase. July 18, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- मागील पाच वर्षांपासून शहरात अमृत कलश योजनेचे काम सुरु आहे. मात्र ते अद्यापही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे नागरिकांची पाण्याची समस्या सुटलेली नाही. आता या योजनेच्या कामाला गति मिळाली असली तरी ती समाधानकारक नाही. त्यामुळे अमृत कलश योजनेचे काम आणखी गतिशील करण्याच्या सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर महानगर पालिका प्रशासनाला दिल्या आहे.
आमदार किशोर जोरगेवार यांनी बैठक घेत अमृत कलश योजनेच्या कामाचा आढावा घेतला यावेळी मनपा आयुक्त राजेश मोहिते, कार्यकारी अभियंता महेश बारई अभियंता विजय बोरीकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे भालधरे, विवेक कामन यांच्या सह इतर अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.