गडचांदूर पोलीसांची धाड.
प्रकरण मॅनेज? हाती गवसला एक डब्बा?
गडचांदूर पोलिसांधले हे गोपी किशन कोण?
लाॅकडाऊन मध्ये अनेक पानटपरीवाल्यांकडून केली वसुली.
Bhairav Diwase. July 18, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- आवारपूर रोडवर सुगंधीत तंबाखू विक्रेत्याचे घर असून दिनांक १७ जुलै रोजी रात्रीचे ७:४५ वाजताचे सुमारास बल्लारपुर वरुन महिंद्रा कंपनीचे आॅटोट्राली क्रमांक एम एच ३४ बि जी ७२०९ ने सुगंधीत तंबाखाची खेप आली व सुगंधीत तंबाखू उतरविण्यात आला याची कुणकुण गडचांदूर पोलीसांना लागली असावी त्यामुळे (काल्पनिक नाव) गोपी व किशन यांनी त्या विक्रेत्याच्या घरी धाड टाकली धाडीत पोलीसांना सुगंधीत तंबाखू मिळाला नाही असे सांगण्यात येत आहे, पोलीसांनी त्या विक्रेत्याला व आॅटोट्रालीला आवारपूरकडे नेल्याची खात्रीलायक माहीती असून प्रकरण मॅनेज केल्याची कुजबुज स्थानिक नागरिकांमध्ये आहे आॅटोट्राली भरुन सुगंधीत तंबाखू आल्यावरही पोलीसांना साठा कसा काय मिळाला नाही मोठी रक्कम घेऊन मामला रफादफा केल्याची शक्यता नाकरता येत नाही.
गावातील पोलीस पाटील व इतर कोणालाही पंच म्हणून पोलीसांनी मोक्यावर का नेले नाही, सदर विक्रेत्यांचा पुर्वीपासूनच सुपारी व सुगंधीत तंबाखूचा व्यवसाय करतो आता हा विक्रेता पानटपरीवाल्यांना सुगंधीत तंबाखू पोहचता करुन देत आहे प्रकरणात सेटलमेंट झाले असल्याने नाममात्र कारवाई साठी एकच डब्बा कसा काय मिळाला लाॅकडाऊनच्या काळात अनेक छोट्या मोठ्या खर्रा विकणार्यांकडूनही पैसे वसुलल्याचे बोलले जाते पोलीसांची भुमिका संशयास्पद असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांनी चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी नांदाफाटा येथील स्थानीक नागरिकांनी केली आहे