Top News

बारावीच्या परीक्षेत सावली तालुका स्तरावर यशोधरा घोटेकार दुसऱ्या क्रमांकावर.

शाळा सूटल्यानंतर घरकाम आणि शेतीकाम करून नियमितपणे अभ्यास करणे असे तिने तिच्या यशाचे गमक.
Bhairav Diwase.    July 18, 2020
   
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणेतर्फे फेब्रुवारी-मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली अंतर्गत विश्वशांती कनिष्ठ महाविद्यालय सावली येथील विविध विभागातील विद्यार्थ्यांनी तालुक्यातून प्रथम आणि द्वितीय क्रमांकाची क्रमवारी संपादित केली आहे यामध्ये विश्वशांती कनिष्ठ महाविद्यालय सावली येथील कला विभागाचा निकाल 90.24% लागला असून कला विभागातुन  कु. यशोधरा प्रकाश घोटेकार कवठी या विद्यार्थीनीने 84.30% गुण मिळवून सावली तालुक्यातून दुसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरली आहे.  सावली  वरून  सात (7) किलोमिटर  यशोधरा शाळेमध्ये जाणे येणे करण्याकरिता  सायकल ने प्रवास करीत होती आणि विशेष असे कि,  शाळा सूटल्यानंतर घरकाम आणि शेतीकाम करून नियमितपणे अभ्यास करणे असे तिने तिच्या यशाचे गमक सांगितले आहे. आपल्या यशाचे श्रेय तिने आई, वडील, परिवार आणि विश्वशांती कनिष्ठ महाविद्यालयाला दिले आहे तालुक्यातून दुसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरली असल्यामुळे महाविद्यालयातील शिक्षकवृंदानी आणि गावकऱ्यानी यशोधरा चे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने