Click Here...👇👇👇

पाथरी येथे अडीच वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार.

Bhairav Diwase
लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधामास कठोर शिक्षा देण्यात यावे गावकऱ्यांची मागणी.
Bhairav Diwase.    July 18, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- सावली तालुक्यातील पाथरी येथे आजच्या सुसंस्कृत समाजातील महाराष्ट्रामध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना काल शुक्रवार रोजी दुपारच्या सुमारास घराशेजारी 45 वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली .
              अडीच वर्षाची चिमुकली बाहेर खेळायला जाऊन घरी आली असता तिला योनिस त्रास होत असून रडत असल्याने तिच्या आईने चौकशी केली असता त्या जागेवर जखमा आढळून आल्या. त्यामुळे चिमुरडीला विचारले असता आरोपी यांच्या घरी जाऊन चिमुकलीच्या वडिलाने विचारपूस केली. परंतु आरोपीने अत्याचार केल्याचे नकार देताच चिमुकलीच्या वडिलाने पाथरी येथील पोलीस स्टेशन गाठून घडलेल्या घटनेची माहिती देत फिर्यादीच्या तक्रारीवरून जितेंद्र रामदास मेश्राम (वय 45 वर्ष) रा. पाथरी यांच्या विरुद्ध बाल लैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. 
              या घटनेची माहिती होताच संपूर्ण गावात तीव्र पडसाद उमटले लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधामास कठोर शिक्षा देण्यात यावे अशी मागणी सर्व पाथरीवासीय नागरिक करीत आहेत. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पाथरी पोलिसांच्या वतीने आरोपीस त्वरित अटक करून त्याच्यावर ( पॉस्को ) अंतर्गत बाल लैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला . पुढील तपास पाथरी पोलीस करीत आहे .