Top News

केमारा-देवाडा जिल्हा परिषद क्षेत्राला मुनगंटीवारनी दिला मदतीचा हात.

केमारा-देवाडा जिल्हा परिषद क्षेत्रातील जिल्हा परिषद सदस्य व जनतेसह कार्यकर्त्यांनीही आ. सुधीरभाऊ यांचे मानले आभार.
Bhairav Diwase.    July 30, 2020


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- कोरोना महामारीच्या काळात या क्षेत्रातील जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळावा म्हणून आमदार सुधीर मुनगंटीवार नेहमी संघर्षरत राहिलेल्या तालुक्याच्या ठिकाणी ग्रामीण भागातून कामानिमित्त आलेल्या कोणत्याहीगरीब व्यक्ती दिवसभर उपाशी राहणार नाही या हेतूने जि. प. सदस्य राहुल संतोषवार यांच्या मागणीचे दखल घेत पोंभुर्ण्यात शिवभोजन केंद्राचे व्यवस्था करून दिलीया क्षेत्रातील अपंग, निराधार, शेतकरी, शेतमजूर यांच्या साठी भरीव मदतीचे कार्य केले.

नवीन गंगापूर येथील पाण्याचा प्रश्‍न तत्काळ मार्गी लावत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला लच्छमपूर येथील पिण्याच्या पाण्याची समस्या तत्काळ सोडवलीएवढेच नव्हे तर बोलला दीक्षित येतील वेस्ट वेअर चे काम मार्गी लावल्या पालकमंत्री नसताना पालकत्वाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केल्याची भावना येथील जनतेत आहे. त्यामुळे या क्षेत्रातील जिल्हा परिषद सदस्य व जनतेसह कार्यकर्त्यांनीही आ. सुधीरभाऊ यांचे आभार मानले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने