Top News

प्राथमिक आरोग्य केंद्र पोंभुर्णा तसेच या अंतर्गत असलेल्या प्रा. आ. उपकेंद्र येथील रिक्त पदे भरण्यात करीता जिल्हा परिषद उपाध्यक्षा यांना दिले मागणी निवेदन.

श्री राहुल भाऊ संतोषवार सदस्य जिल्हा परिषद चंद्रपुर यांची मागणी.
Bhairav Diwase.    July 16, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- प्राथमिक आरोग्य केंद्र पोंभुर्णा तसेच या अंतर्गत असलेल्या प्रा. आ. उपकेंद्र येथील रिक्त पदे भरणेबाबत प्राथमिक आरोग्य केंद्र पोंभुर्णा येथील आरोग्य सहाय्यक पुरुष चे एक पद तसेच त्याअंतर्गत असलेल्या पोंभुर्णा उपकेंद्र येथील आरोग्य सेवक (पु) चे एक पद डोंगर हळदी उपकेंद्रक येथील आरोग्य सेवक (पु) चे एक पद चेक बल्लारपूर उपकेंद्र येथील आरोग्य सेविका (स्रि कंत्राटी) हे एक पद चिंतलधाबा उपकेंद्र येथील आरोग्य सेविका (कंत्राटी) चे एक पद व सी एच ओ चे एक पद आणि उमरी पोतदार उपकेंद्र येथील सी एच ओ चे एक पद असे एकूण सात पदे रिक्त आहेत त्यामुळे उपरोक्त रिक्त पदे भरणे आवश्यक आहे त्याअनुषंगाने रिक्त पदे भरण्याची तात्काळ कार्यवाही करण्यात यावी.
 यासाठी श्री राहुल भाऊ संतोषवार सदस्य जिल्हा परिषद चंद्रपुर यांनी मा. रेखा कारेकर उपाध्यक्षा तथा सभापती आरोग्य व शिक्षण समिती जिल्हा परिषद चंद्रपुर यांना मागणी निवेदन दिण्यात आले. वासुदेव पाल उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने