Top News

चिमूर तालुक्यातील नेरी येथे आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद.

Bhairav Diwase.    July 30, 2020

(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- आज सुधीर मुनगंटीवार यांचा  वाढदिवस यावर्षी सुद्धा आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा वाढदिवस जिल्हाभर सेवा दिन म्हणून साजरा करण्यात आला.
त्याचप्रमाणे वाढदिवसाच्या निमित्ताने नेरी येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले यावेळी अनेक रक्तदात्यांनी रक्तदान करून सेवा दिली.कोरोनाच्या काळात मोठ्या प्रमाणात रक्त साठ्यांची गरज आहे त्यामुळे
त्यांच्या रक्तदान सेवार्थ बद्दल त्यांचे सन्मान पत्र व किट देऊन अभिनंदन करण्यात आले.

चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडीया यांच्या पुढाकारातून व भारतीय जनता पार्टी चिमुर, भारतीय जनता युवा मोर्चा चिमूर तालुका, भारतीय जनता पार्टी नेरी यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिर घेण्यात आले यावेळी अनेक रक्त दात्यांनी रक्त देऊन शिबिराला उत्तम प्रतिसाद दिला.

यावेळी श्री डॉ. श्यामजी हटवादे जिल्हा उपाध्यक्ष भाजपा चंद्रपूर, श्री मनोज मामीडवार जिल्हा परिषद सदस्य चंद्रपुर ,संदीप पिसे युवा मोर्चा सचिव जिल्हा, विलास कोराम माजी उपसभापती पंचायत समिती चिमुर, श्री.विलास चांदेकर, श्री नरेंद्र पंधरे शहराध्यक्ष नेरी भाजपा, संदेश पंधरे,कन्हैया सिंह भौंड, दादाराव पिसे ,पिंटू खाटीक किसनजी पंधरे ,मंगेश धाडसे, सुरज गभणे इत्यादी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने