Top News

त्या ५८ युवकांनी परंपरा ठेवली कायम.

आ मुनगंटीवारांच्या  वाढदिवसाला रक्तदान शिबिर.

सुभाष कासंगोट्टूवार मित्र परिवारचा उपक्रम.
Bhairav Diwase.    July 30, 2020

(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) राहुल बिसेन उर्जानगर, चंद्रपूर
चंद्रपूर:- चंद्रपुर येथील तुकुम प्रभागातील मातोश्री  सभागृहात आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून आज गुरुवार (३० जुलै)ला भव्य रक्तदान शिबिरचे आयोजन नगरसेवक सुभाष कासंगोट्टूवार मित्र परिवार तर्फे करण्यात आले.यात ५८ युवकांनी रक्तदान करून सलग ७ व्या वर्षी आ सुधीर मुनगंटीवार यांचा वाढदिवस साजरा केल्याने रक्तदानाची परंपरा कायम राहिली आहे*
यावेळी उदघाटक म्हणून महापौर राखी कंचरलावार,यांची तर अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हाअध्यक्ष (महानगर)डॉ मंगेश गुलवाडे,प्रमुख अतिथी म्हणून भाजपा नेते राजेन्द्र गांधी, प्रमोद कडू,प्रकाश धारणे,ऍड सुरेश तालेवार,जी प सदस्य ब्रिजभूषण पाझारे,विद्या बांगडे,बी आय टी चे संजय वासाडे,प्रा श्रीकांत गोजे,गुरुदेव सेवा मंडळचे अध्यक्ष अनमुलवार,मुक्ती फौंडेशनच्या मंजूश्री कासंगोट्टूवार ,प्रज्ञा बोरगमवार,पत्रकार प्रशांत विघ्नेश्वर,दिवाकर बोबडे,विजय नळे, पुरुषोत्तम राऊत,पास्टर सुनील कुमार यांची मंचावर उपस्थिती होती.
या प्रसंगी उदघाटन  करतांना राखी कंचरलावार म्हणाल्या,स्वतःच्या वाढदिवसाला रक्तदान करणे हे आता समाजात रुळले आहे,पण ज्यांचा आदर्श घेऊन आपण चालतो त्यांचे वाढदिवसाला रक्तदान करणे खरंच स्तुत्य उपक्रम आहे.प्रेमाला कृतीची जोड हवी यालाच म्हणतात. कोरोनाचे संकट असताना रक्तदान करणे,म्हणजे युद्धात उतरण्यासारखेच आहे, असे त्या म्हणाल्या. यावेळी बोलताना डॉ मंगेश गुलवाडे,म्हणाले कोरोना संकटात रक्तदान करुन आपण जनसेवा करीत आहो.ही सेवा अविरत सुरू ठेवण्याचा संकल्प आपण केला पाहिजे.यावेळी प्रास्ताविकात आयोजक सुभाष कासंगोट्टूवार यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगत सर्व रक्तदात्यांना आ.मुनगंटीवार यांचे तर्फे प्रमाणपत्र देण्यात येत असल्याचे जाहीर केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते चैतन्य भजन मंडळी तुकुम यांना तबला-पेटी भेट देण्यात आली. मुक्ती फौंडेशन व भाजयुमो तर्फे पदवीधर मतदारांचे ११०० फॉर्म गांधी आणि कडू यांना सुपूर्त करण्यात आले. भाजपा नेते प्रमोद कडू,राजेंद्र गांधी,संजय वासाडे,ब्रिजभूषण पाझरे यांनी समयोचित मार्गदर्शन केले. रक्तसंकलन साठी वैद्यकीय महाविद्यालयातील चमुने डॉ साने मॅडम यांच्या नेतृत्वात महत्वाची भूमिका बजावली.अमीन शेख यांनी आभार मानले.यशस्वितेसाठी सुधाकर टिकले, जितेंद्र वाकडे,शुभम गेडाम,धनराज कोवे,कल्पना गिरडकर,सपना नामपल्लीवर,विजय लोखंडे, आशा देऊळकर, करण जोगी,राणी कोसे आकाश मस्के,महेश कोलावार आणि राणी शेख मॅडम ने परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने