मुल शहरात आणखी एक पॉझिटिव.

Bhairav Diwase
राईस मील मजुरांच्या आला होता संपर्कात.
Bhairav Diwase. July 10, 2020

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) संजय मेकर्तीवार, मुल
मुल:- शहरात आज आणखी एक कोरोणा बधीत आढळून आल्याने प्रशासनाने त्याला ताब्यात घेऊन पुढील उपचाराकरिता चंद्रपूरला रवाना केले आहे. बाधितांचे कुटुंबियांचे स्वॅब घेऊन त्यांच्या कुटुंबीयांना कोरनटाईन केले आहे.

बाधिताच्या संपर्कात आलेल्यांचा प्रशासन शोध घेत आहे. आज आढळून आलेला कोरोणा बाधित हा राईस मिल परिसरात असलेल्या परप्रांतीय मजुरांच्या संपर्कात आला होता. त्यामुळे त्याला लागण झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
मूळच्या राईस मिल मधील परप्रांतीय मजूर हे राईस मिलमध्ये गृह विलगीकरणात होते. आज सापडलेल्या बाधितामुळे, हे मजूर शासनाचे निर्देश डावलून शहरात फिरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या मजुरांवर आणि ज्या राईस मिल मालकांवर यांची जबाबदारी होती त्या राईस मिल मालकावर पोलीस प्रशासन कारवाई करेल काय? याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.