आगीत होरपळून एक बैल दोन गायी ठार.

Bhairav Diwase
पाचगाव येथील मडावीगुडा येथील घटना.
Bhairav Diwase.    Aug 04, 2020

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- राजुरा तालुक्यातील पाचगाव येथील मडावीगुडा येथे काल रात्री साडे अकराच्या सुमारास गोठ्याला लागलेल्या आगीत होरपळून एक बैल व दोन गायी ठार झाल्याची घटना घडली. या आगीत एक बैल सुदैवाने बचावला मात्र बैल तीस टक्के जळाला आहे.


गोविंदा मडावी यांच्या गोठ्याला काल रात्री आग लागली. सर्व गावकरी झोपेत असल्यामुळे आग नागरिकांच्या लक्षात आली नाही. आगीची भीषणतेमुळे गोठ्यातील बैल व गायींसह कोंबड्या, शेतीअवजारे, खत व कीटकनाशके जळून खाक झाली. गोठ्यावरील लाकूड फाट्याचे मोठे नुकसान झाले. 2 लाख रुपयांच्या आसपास शेतकरी गोविंदा मडावी यांचे नुकसान झाले. ऐन शेती हंगामात त्यांच्यावर या घटनेमुळे आभाळ कोसळले आहे. तलाठी यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. आगीचे कारण मात्र कळू शकले नाही. यावेळी गावकऱ्यांनी सदर शेतकऱ्याला शासकीय मदत मिळवून देण्याची मागणी केली.