संतोष कुमार यांचा पत्रकार संघातर्फे सत्कार.
दिव्यांग चित्रपटासाठी मिळाले पुरस्कार.
Bhairav Diwase. Aug 04, 2020
मुल:- पुर्व विदर्भातील झाडीपट्टीतील कलावंतानी साकरलेल्या दिव्यांग या मराठी चित्रपटाला यावर्षीचा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार आणि हैद्राबाद येथील एसएसबीसी ग्रुप आॅफ इंडियन अकॅदमीचा उत्कृष्ट संगीताचा नॅशनल शार्ट फिल्म अवार्ड पुरस्कार मिळाला आहे. त्या चित्रपटाला संगीतकार, गायक आणि नट संतोषकुमार वरपल्लीवार यांनी साकारले आहे.
त्या निमित्त्य चित्रपटाचे संगीतकार व गायक श्री. संतोष कुमार वरपल्लीवार यांचा सत्कार महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने पंचायत समितीचे सभापती श्री. चंदुभाऊ मारगोनवार यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि वृक्षरोपट देवुन मुल येथील कर्मविर मा.सा. कन्नमवार सांस्कृतीक सभागृहाच्या प्रांगणात दिनांक 3 आॅगस्ट 2020 रोजी करण्यात आले. यावेळी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष सतीश आकुलवार, सरचिटणीस मनिष रक्षमवार, सदस्य नंदलाल दुर्गे, गौरव पराते, नितेश मॅकलवार, संजय मेकर्तीवार आदि उपस्थित होते.
संतोषकुमार हे मुल तालुक्यातील नवेगांव भू. येथील रहिवासी असुन झाडीपट्टी नाटय कलावंत, रंगकर्मी नट आणि गायक अशी त्यांची बहुख्याती व्यक्तीमत्व असुन तालुक्यासाठी गौरवाची बाब आहे. संतोष कुमार वरपल्लीवार हे पेशाने प्राथमिक शिक्षक असुन त्यांनी नाटयक्षेत्रात भरीव अशी कामगिरी केली आहे. निजला का राजहंस माझा, भाकर, एक माणुस झपाटलेला ही त्यांची गाजलेली झाडीपट्टीतील नाटके आहेत.