लॉकडाऊनच्या काळात रेतीमाफियांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष.

Bhairav Diwase
नलेश्र्वर च्या नदीपात्रातून रेतीचे अवैध उत्खनन जोरात.
Bhairav Diwase.    Aug 03, 2020


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) संजय मेकर्तीवार, मुल
मुल:- मुल तालुक्यातील सुशी दाब गावं, नलेश्र्वर या नदीपात्रातून रेतीचे अवैध उत्खनन राजरोसपणे सुरु असून लॉकडाऊनच्या काळात प्रशासन व्यस्त असल्याचे फायदा घेत रेती माफियांकडून अवैख वाहतूक स्थानिक तलाठी, मंडळ अधिकारी व पोलीस प्रशासनासमोर होत असल्याचे चित्र दिसून येत आहेत.
तालुक्यातील रेतीघाटाचे लिलाव झालेले नाहीत. बांधकाम करणाऱ्यांना छुप्या मार्गाने, वाढीव दरात रेतीचा पुरवठा केला जात आहे. तालुक्यात रेतीचे अवैध उत्खनन करून वाहतूक करणारे रेतीमाफिया शासनाचे उत्पन्न बुडवत असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील सुशी दाब गावं, नालेश्र्वर या ठिकाणाहून लॉकडाऊनच्या काळात अवैध रेती तस्करी मोठ्या प्रमाणात सुरु आहे. रेतीतस्करांनी थेट नदीपात्रात पोकल्यांड मशीन आणून नदित्तील रेती काढून रस्त्यावर व शेतात रेतीमाफिया अवैध रेतीचा साठा करीत आहेत. वा रात्रीची संधी बघून शेकडो ब्रास रेतीची मोठ्या प्रमाणात चोरी करून चंद्रपुरात वाहतूक करून मोठ्या भावात विकत जात आहे.
कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जिल्हाभर खासगी, शासकीय कार्यालये बंदचा आदेश दिला आहे. जिल्हा न्यायालयाचे कामकाज मर्यादीत वेळेत आटोपले जातात. गर्दी टाळण्यासाठी शक्य तेवढ्या उपाययोजना प्रशासनाकडून केल्या जात आहेत. सर्वसामान्य नागरिकांनाही घराबाहेर पडू दिल्या जात नाही. हीच संधी रेतीमाफियांनी हेरली आहे. सर्व प्रमुख मार्गावरून मनमर्जीने अवैध रेतीचे परिवहन सुरु आहे. अनेक शासकीय कर्मचारी बघ्याच्या भूमिकेत आहेत. मूल तालुक्यातील भेजगाव, हळदी, येरगाव, सुशी दाबगावं, नलेश्वर येथून अवैधपणे रेतीचीउचल केली जात आहे. अवैध उत्खनन व वाहतुकीला तहसीलदारांनी आळा घालणे आवश्यक आहे.

ट्रका व ट्रॅक्टर द्वारे रेतीची वाहतूक.

चुलबंद नदीतून शेकडो ब्रास रेतीचे अवैध उत्खनन व चोरी सर्रासपणे सुरु आहे. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी पोकल्यंड च्या सहायाने अनेक सुशी दाब गावं, नालेश्वर घाटावरून हायवा ट्रॅक ने जिल्ह्यात व परिसरातील खासगी व शासकीय बांधकामांना सर्रासपणे रेती पुरविली जात असते. ही अवैध वाहने पोलीस स्टेशनसमोरून जात असतात. सुशी नदीघाट रेतीमाफियांसाठी तस्करीचे कुरण बनले आहे. रेतीमाफियांची मोठी टोळी असून ते प्रशासन व्यस्त असल्याचा फायदा घेत आहेत. सुशी दाब गावं घाटावर रात्रभर हायावा ट्रॅक ची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते.