खंडणी मागितल्याचा आरोप - आरटीओ शिंदे यांची तक्रार.
Bhairav Diwase. Aug 04, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वंभर शिंदे यांनी ट्रॅव्हल चे काम करणारे राहुल तायडे यांच्याविरोधात खंडणी मागत असल्याचा आरोप केला असुन ह्या आशयाची रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
राहुल तायडे उपविभागीय परिवहन अधिकारी शिंदे ह्यांना मागील 1 वर्षापासून सतत त्रास देत आहेत तसेच वारंवार पैशाची मागणी करीत असुन पैसे दिले नाही तर खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
राहुल तायडे यांनी काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी कांग्रेस चे शहर अध्यक्ष राजीव कक्कड़ यांच्यासोबत अधिकारी विश्वंभर शिंदे यांच्याविरोधात घेण्यात आलेल्या प्रेस वार्ता मधे उपस्थिती होती. प्रेस वार्ता नंतर तायडे वारंवार खंडणी मगित आहेत अशी तक्रार रामनगर पोलीस स्टेशन ला करण्यात आली.
राहुल तायडे विरुद्ध कलम 385,501(भा. द वी ) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. आज दुपारी 12 वाजेपासुन तायडे यांची विचारपूस करण्यात आलेली आहे.या नंतर संध्याकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर रात्री जवळपास 8:30 वाजता बातमी लिहे पर्यंत तायडे ह्यांना वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले होते. सदर प्रकरणाचा तपास रामनगर पोलिसचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लाकडे करित आहेत.