Top News

महिला वनरक्षकाची शेतकऱ्यांना शिवीगाळ.

शेतकऱ्यांची कारवाईची मागणी, उपसंचालकांना निवेदन सादर
Bhairav Diwase.    Aug 04, 2020



(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- चिमूर तालुक्यातील खडसंगी वनपरिक्षेत्र (बफ्फर) अंतर्गत येणाऱ्या झरण, (मांगरूड) शेतशिवरातील शेतकरी धान पिकाला झरणातील बोडीचे पाणी करीत असताना या क्षेत्राच्या महिला वनरक्षक यांनी शेतीला पाणी करणाऱ्या शेतकऱ्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप वनपरिक्षेत्र अधिकारी खडसंगी (बफ्फर) यांना केलेल्या तक्रारीतून करीत  कारवाईची मागणी केली आहे
         वनपरिक्षेत्र खडसंगी बफ्फर झोन अंतर्गत येणाऱ्या रामदेगी झरण परिसरातील जंगलाला लागून खडसंगी, झरी,येथील शेतकरी यांच्या वडिलोपार्जित धानाच्या शेती आहेत सध्या धान रोवणीचा हंगाम सुरू असल्याने अनेक शेतकरी आपल्या शेतावर रोवणी,पाणी करणे,खत टाकणे आदी कामे करण्यासाठी या परिसरातील शेतात जातात 
      मात्र हा शेतशिवार परिसर वनपरिक्षेत्र खडसंगी बफ्फर झोन क्षेत्राला लागून आहे  या क्षेत्राचा पदभार महिला वनरक्षक कौशल्ये सिंग याच्या कडे आहे 
       खडसंगी येथील शेतकरी लक्ष्मण कटबरये हे झरण परिसरातील धानाच्या शेतीला नाटा द्वारें पाणी करीत असताना महिला वनरक्षक कौशल्ये सिंग यांनी त्या पाण्याच्या नाटावर येत शेतकरी लक्ष्मण कटबरये याना अर्वाच्च शब्दात बोलून शिवीगाळ करीत, मोबाइल हिसकावून, दमदाटी करून, पोलिसाची धमकी दिल्याचा आरोप वनपरिक्षेत्र अधिकारी बफ्फर खडसंगी यांना दिलेल्या तक्रारीतून केला आहे
         झरण परिसरात खडसंगी, झरी येथिल अनेक शेकार्याच्या शेती बफ्फर झोन क्षेत्रा लगत आहेत त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना रात्री  बेरात्री  शेतावर जावे लागते त्यामुळे या महिला वनरक्षक यांच्या अश्या वागणुकी मुळे शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे तेव्हा या प्रकरणाची चौकशी करून संबंधित वनरक्षकावर कारवाई करण्याची मागणी शेतकरी, लक्ष्मण कटबरये,अरविंद पाटील,दिवाकर शेंडे,बापूराव जीवतोडे,विलास शेंडे, यांच्यासह अनेक शेतकऱयांनी उपसंचालक (बफ्फर) यांना तक्रारीतून  केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने