Top News

निराधारांना आधार देण्यास युवक पुढे सरसावल.

आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा झाला, आ.सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचा  वाढदिवस..
 
१४३६ लाभार्थ्यांना मिळणार आता शासकीय योजनांचा लाभ.

महाकाली प्रभागातील युवकांचा उपक्रम.
Bhairav Diwase.    Aug 04, 2020


(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) राहुल बिसेन उर्जानगर, चंद्रपूर
चंद्रपूर:- भारतीय जनता पार्टी तर्फे संपूर्ण जिल्ह्यात लोकनेते आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा वाढदिवस (३० जुलै) सर्वत्र साजरा  केला गेला. परंतु माता महाकाली प्रभाग क्र १२ च्या युवामंडळीने आगळ्या-वेगळ्या पद्धतीने युवानेते प्रज्वलंत कडू यांचे नेतृत्वात आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा वाढदिवस साजरा करीत,गुरुवार (३०जुलै) ते १ ऑगस्ट सलग ३ दिवस सेवा शिबिर चे आयोजन केल्याने  तब्बल १४३६ गरजूंना आता शासकीय योजनांचा लाभ घेता येणार आहे.*
*महाकाली प्रभाग क्र.१२ येथील तिरुमला सभागृहात ३दिवस चाललेल्या या शिबिराला भाजपा जिल्हाध्यक्ष(ग्रा.) देवराव भोंगळे, जिल्हाध्यक्ष (शहर)डॉ मंगेश गुलवाडे,महापौर राखी कांचारलावर,भाजपा नेते प्रमोद कडू,प्रकाश धारणे, सुभाष कासंगोट्टूवार,दत्तप्रसन्न महादाणी,प्रशांत विघ्नेश्वर यांनी भेट देऊन युवकांचे कौतुक केले व शिबीरची माहिती घेतली.*

 *भाजपा महानगर तर्फे ३० जुलै ते५ ऑगस्ट पर्यंत सेवा सप्ताह साजरा करण्याची घोषणा जिल्हाध्यक्ष डॉ गुलवाडे यांनी केल्यावर महाकाली प्रभागातील युवकांनी पक्षाने निर्धारित केलेला सेवा प्रकल्प हाती घेतला.* *त्यामुळे११५*
*निराधारांना निराधार*योजनेचा,* *५२३लोकांना जनधन योजनेचा* *८२ गरजूंना श्रावणबाळ योजनेचा लाभ  मिळावा यासाठी तर* *२८३ नवीन मतदार,१३० लोकांना क्षिधापत्रिका,२०१ लोकांना मिळकत प्रमाणपत्र,* *तर १०२ मतदारांच्या ओळख पत्रात पाहिजे तो बदल करून देण्यात आल्याने एकूण १४३६ गरजू सुखावले आहेत*
*पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी सरकारने गरिबांसाठी अनेक योजना केल्या आहेत, पण त्याची माहिती या लोकांना नाही व त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. जनतेला याचा लाभ मिळावा म्हणून महाकाली प्रभागातील युवकांनी तिरुमला भवनात एका जनसेवा कार्यक्रम केले.महानगर भाजपा च्या वतीने नियोजित या उपक्रमात युवकांनी बाजी मारली.आणि आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना वाढदिवसाची अनोखी भेट दिली.जनसेवा कार्यक्रम असे या उपक्रमाचे नामकरण  नगरसेवक सुभाष कासंगोट्टूवार,प्रज्लंत  कडू,अमीन शेख ,रामकुमार आकापेलिवार यांनी केले.संजय गांधी निराधार योजना,राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना,श्रावण बाळ योजना,प्रधानमंत्री जनधन खाते,क्षिधापत्रिका पत्रिका असे अनेक अडचणीच्या वाटणाऱ्या विषयाला सोपे करून शासकीय अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले होते. .बघता बघता ३दिवसात १४३६ गरजूंना दिलासा मिळाला. *या संदर्भातील अहवाल युववर्गाने आ सुधीरभाऊ मुनगंटीवार व युवानेते प्रज्वलंत  कडू यांच्या जन्मदिनाचे (३० जुलै व१ ऑगस्ट)औचित्य साधून यांनी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे व डॉ मंगेश गुलवाडे यांचे स्वाधिन केल्याने  या अभिनव उपक्रमाची चर्चा नगरसेवकात आहे*
*येथील नगरसेवक अनुराधा हजारे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रज्वलंत  कडू व सूरज पेदूलवार यांनी हे आयोजन केले. पंकज निमजे,राहुल शेंडे,  श्रीकांत येलफूलवार, विवेक शेंडे, वैभव बल्लेवार, रिंकेश ठाकरे, आशीष खाडिलकर, राकेश फलके, आकाश घोटेकर, नीतेश   वाढई, सचिन यामावार, पवन वाढई, प्रितम खडसे, चेतन इंगोले, आकाश निकोडे, कुणाल निकोडे, अनिकेत चौधरी, आदर्श चौधरी, सुमित मोहुर्ले, सौरभ बंडेवार, सुमित पटेल, नरेंद्र पराते, राहुल मांढरे,राहुल खेवले या युवकांनी मोलाचे सहकार्य केले.*

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने