Top News

बिरसा क्रांती दल राज्यभर आंदोलन करणार.

वन अधिकारी गुरुप्रसाद यांना बड़तर्फ करा.

दीडशे शेतकऱ्यांनी सिंदेवाही पोलिसात तक्रार दाखल.
Bhairav Diwase.    Aug 04, 2020

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- वन अधिकारी गुरुप्रसाद व कर्मचारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाहून शेतीची नासधूस करणे. शेतातील बांध सपाट करणे, उभ्या पिकांवर ट्रक्टर चालविणे,शेतकऱ्यांना धमकाविणे व कोऱ्या कागदावर सही घेणे असे असंविधानिक प्रकार वन अधिकारी गुरुप्रसाद व इतर यांचेकडून चालू आहेत हे सर्व प्रकार शासन निर्णय व मा. उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशाची अवमान करणारा आहे. चंद्रपूर जिल्हा आदिवासी बहुल व जंगल व्याप्त परिसर आहे. त्यामुळे आदिवासी व गैरआदिवासी लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून वनजमीनिवरती वडिलोपार्जित उदरनिर्वाह चालतो. वरील कायद्याच्या अनुषंगाने वनदावे प्राप्त होण्यासाठी ग्रामसभेच्या मार्फतीने मागील १० वर्षापासून वनदावे सादर केले आहेत मात्र सबंधित यंत्रणेकडून काही दावे निकाली काढून काही दावे तांत्रिक अडचणीमुळे यंत्रणेकडे प्रलंबित आहेत आणि जे दावे प्रलंबित आहेत त्या कोणत्याही शेतकऱ्यांच्या बांधावर जाता येणार नाही अथवा कुठलीही नुकसान करता येणार नाही असा मा.जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचा सक्त आदेश आहे. असे असताना सुद्धा वनाअधिकारी गुरुप्रसाद व कर्मचारी २००५ च्या पूर्वी राहणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसान करीत आहे. अश्या मुल, चिमूर, सिंदेवाही, चंद्रपूर, गोंडपिपरी, सावली या तालुक्यातील दीडशे शेतकऱ्यांनी सिंदेवाही पोलिसात तक्रार दाखल केलेली आहे. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान केलेले आहे. त्या शेतकऱ्यांना वन अधिकारी गुरुप्रसाद यांचा पगारातून वसूल करण्यात यावे व त्यांना बळतर्फ करण्यात यावे अशी मागणी असे बिरसा क्रांती दल तर्फे आज प्रेस वार्ता मध्ये करण्यात आली आहे. वरील विषय अतिशय गंभीर असून सदर प्रकरणाची रीतसर चौकशी करून आदेशाची पायमली करणाऱ्या वन अधिकारी गुरुप्रसाद व वनकर्मचाऱ्यावर कारवाई करून अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा. जितेश कुलमेथे, पंकज कुलमेथे, प्रभाकर बोरकर, नरेंद्र मंडावी, रवि मेश्राम, साईराम मंडावी, उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने