Top News

आ. सुधीर मुनगंटीवार यांची कार्यसेवा, कार्यप्रेरणा जनमनात रुजत आहे.

आम्ही मा. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे कार्यकर्ते , आमची जबाबदारी कोरोनाच्या काळात खचून जाण्याची नाही, तर मदत करण्याची आहे.
चंद्रपूर:- कोरोनाच्या काळात चंद्रपुरात देवदूत बनून सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्याभर अनेक मदत केली, आजही करत आहे. हजारो धान्यकिट,रक्तदान शिबिर , सॅनिटायझर , मास्क वाटप केले,जनतेसोबत संवाद जपला तसेच शेकडो कार्यकर्त्याना समाजाच्या मदतीसाठी आपण सतत सक्रिय राहिलो पाहिजे याचे मार्गदर्शन सुधीरभाऊ वारंवार करत आहेत. विशेष म्हणजे आतापर्यंत जिल्ह्यात 35 सॅनिटायझर मशीन सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी उपलब्ध करून दिल्या आहे. जिल्ह्यात आज घडीला कोरोनाचा आकडा वाढत असतांना , लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार हे खचून न जाता जमेल ती मदत करताना पाहण्यास मिळते .

मा.सुधीरभाऊ यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्तेही सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या पाऊलावर पाऊल टाकत त्याच जोमाने सामान्य जनतेची व प्रशासनाची मदत करताना पुढे सरसावले आहे .

आता सुधीर मुनगंटीवार हे एक लोकप्रतिनिधी नसून ते लोकसेवा अभियानाचा एक विचार झाले आहेत .

जनतेला कोरोनामुक्त करण्यासाठी प्रशासन राबत आहे विशेषतः पोलिस बांधवांनी त्यात मोठे योगदान दिले आहे, याचे उतराई होण्यासाठी गोंडपीपरी तालुक्यातील सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे कार्यकर्ते अमर बोडलावार यांनी ७ ऑगस्टला आपल्या नेत्याची प्रेरणा घेत गोंडपीपरी पोलीस स्टेशन येथे सॅनिटायजर मशीन दिली .

आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने धाबा येथील पोलीस स्टेशन ला सुहास माडुरवार यांच्या पुढाकाराने सॅनिटायझर मशीन चे लोकार्पण पार पडले .


कोरोनाच्या या महामारीत सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे कार्यकर्ते अजून ताकतीने मदत करण्याची इच्छा व्यक्त करताना दिसत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने