Top News

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त्याने मारोडा येथील ग्राम प्रशासकीय भवनाचे लोकार्पण कार्यक्रम व सौर ऊर्जा पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण, ऑटोमॅटिक सॅनिटायझर मशीनचे लोकार्पण.

Bhairav Diwase. Aug 15, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) संजय मेकर्तीवार, मुल
मुल:- स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त्याने मारोडा येथील ग्राम प्रशासकीय भवनाचे लोकार्पण कार्यक्रम व सौर ऊर्जा पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण, ऑटोमॅटिक सॅनिटायझर मशीनचे लोकार्पण व वृक्षारोपण मा. आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार माजी अर्थनियोजन वनमंत्री महाराष्ट्र राज्य व आमदार बल्लारपूर विधानसभा क्षेत्र यांच्या शुभहस्ते पार पडला कार्यक्रमाचे उद्घाटक श्री. मा. आ. सुधीर मुनगंटीवार कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.सौ. संध्याताई गुरनुले अध्यक्ष जिल्हा परिषद चंद्रपूर कार्यक्रमाचे विशेष अतिथी श्री माननीय चंदूभाऊ मारगोनवार सभापती पंचायत समिती मुल .श्री. घनश्यामजी जुमनाके उपसभापती प.स. मूल, साै.रत्नमाला भोयर नगराध्यक्ष न.प. मूल व गावातील भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन श्री. कलोडे सर गट विकास अधिकारी पंचायत समिती मूल, श्री.भोयर साहेब ग्रामविस्तार अधिकारी ग्रा.पं.मारोडा साै.स्वातीताई पुनकटवार सरपंच ग्रा.प. मारोडा.साै.सुलभाताई नन्नावरे उपसरपंच ग्रा.पं. मारोडा श्री पंकजभाऊ पुल्लावार सदस्य ग्रा.प. मारोडा व ईतर संपूर्ण ग्रा.प. सदस्य कार्यक्रमाचे संचालन. श्री. कन्नाके सर मुख्याध्यापक जि. प. प्राथमिक शाळा मारोडा यांनी केले श्री मा.आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार मारोडा या गावातल्या लोकांचा प्रेम बघून सोमनाथ देवस्थान सौंदर्यकरण, उमरी ते मारोडा या रस्त्याचे सिमेंट खळगिकरण, मारोडा येथे रेल्वे प्लॅटफॉर्मवर शेड मारोडा येथे पशुवैद्यकीय दवाखाना व विविध काम करण्याचे आश्वासन दिले भाऊ मंत्री असताना मारोडा या गावासाठी भरपूर निधी प्राप्त करून दिली भाऊआता आमदार असतानाही मारोडा या गावासाठी भरपूर निधी उपलब्ध करून देऊ असं आश्वासन गावकऱ्यांना दिले स्वर्गीय मा.सा.कन्नमवारांची कर्मभूमी म्हणून सुधीर भाऊ मारोडयावर सदैव प्रेम करत राहतात.
आणि असंच सदैव प्रेम करत राहू असे सुधीरभाऊ मारोडा वासियाणा भाषांनातून सांगितले व सुधीरभाऊ न केलेल्या कामाचा एक सुंदर फोटो बनवून पंकजभाऊ पुल्लावार.अमोल बालमवार संजय मेकर्तीवार.राहुल तोटावार.मिळून भाऊला भेट दिली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने