Bhairav Diwase. Aug 14, 2020
सावली:- सावली तालुक्यातील कोरोना पॉजिटीव्हची संख्या सात झाली आहे. हिरापूर येथील एक महिला कोरोना पॉजिटीव्ह निघालेली होती. त्यानंतर सदर महिलेच्या घरातीलच दोन महिला पॉजिटीव्ह निघाल्या. त्यामुळे सावली मध्ये कोरोना पॉजिटीव्ह एकूण सहा झाले. त्यानुसार सदर महिलेच्या घरातील सर्व सदस्यांची तपासणी करिता सावली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले आहेत. त्यानुसार परिवारातील एकाची कोरोना तपासणी केली असता पुन्हा एकाचा तपासणी अहवाल हा पॉजिटीव्ह आला आहे. त्यामुळे त्याला चंद्रपूर येथे हलवण्यात आले आहे. अशाप्रकारे कोरोना पॉजिटीव्ह ची संख्या ही सात झालेली आहे. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व कामावरील महिलांचे सुध्या नमुने तपासणी करीता घेण्यात आले. संपूर्ण गावाची तपासणी करणे चालू आहे. त्यामुळे हिरापूर हे गाव संपूर्ण लॉक करण्यात आलेले आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत