Top News

चिमुकल्याना शिक्षण: सावली तालुक्यातील ऊसरपार तुकुम येथील युवकांचे प्रेरणादायी उपक्रम.

Bhairav Diwase.    Aug 14, 2020
   
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- कोरोना महामारी व लाकडाऊन मुळे गाव शहर बंद आहे. शाळाही बंद आहे. त्यामुळे गावातील चिमुकले घरात आणि परिसरात खेळताना दिसतात, अशावेळी बालकांना संस्काराचे धडे दिले तर नक्कीच कोवळ्या मनावर सकारात्मक परिणाम होतात. सामाजिक जाणीव असणाऱ्या तसेच गावातील तरुणांनी चिमुकल्यांना एकत्रित करून स्वतःच्या घरीच ज्ञानशाळा सुरू केली सावली तालुक्यातील 
उसरपार तुकुम  येथील शेतकरी कुटुंबातील पल्लवी चौधरी, महेश रणदिवे तसेच सहकारी म्हणून श्रीपाल  घोडमारे आणि हिनाताई सावसाकडे या तरुणांनी हा 
ज्ञानशाळेचा उपक्रम हाती घेतला. ह्या तरुणांचा उपक्रम परिसरात प्रेरणादायी ठरत आहे .
सदर विद्यार्थी हे  शहरात शिक्षण घेत असून लाडावून मुळे गावाकडे अडलेली आहेत. तशातच गावात आल्यानंतर लाकडाऊन मूळे गावातील छोट्या मुलांची मुलांची शाळा बंद असल्याने आपल्या शिक्षणाचा व ज्ञानाचा उपयोग या मुलांसाठी व्हावा असे त्यांच्या मनात आले. त्यासाठी त्यांनी गावातील मुलांना शिकविण्याचे ठरविले कोरोना चे संकट लक्षात घेऊन आई व मुलांच्या वडिलांची परवानगी घेऊन त्यांनि हा उपक्रम गावात सुरू केला .
गावातील 25 मुलांची दररोज सायंकाळी 6 ते 8 या वेळात 
ज्ञानशाळा भरते हीच आमची प्रार्थना पण हेच आमचे मागणे, माणसाने माणसाची माणसासम वागणे .या प्रार्थनेने ज्ञानशाळेची सुरुवात होते .
ज्ञानशाळेत मुले रोज वेळेवर शिस्तीत हजर होतात.
 हसत -खेळत शिक्षण म्हणून गमतीचे गीत, प्रेरणादायी गोष्टी, जनरल नॉलेज प्रश्न, शाररिक व्यायाम घेतले जाते   तसेच मुलांच्या शालेय अभ्यासक्रम व पुढील दिवसांचा गृहपाठ देखील मुलांना दिला जातो.
 या ज्ञानशाळेत विद्यार्थी कमालीचे एकरूप झाले असून त्यांच्यात शिक्षणाची गोडी निर्माण झाली आहे .
त्यांच्या ज्ञानशाळेत बालवाडी ते ते पाचवी पर्यंतचे विद्यार्थी आहेत तसेच या ज्ञानशाळेचे समारोप 
वंदे मातरम् या गीताने होतो या उपक्रमाने गावातील मुलांना अभ्यासाची सवय शिस्त लागल्याने पालकांनाही आनंद व्यक्त केलेले केला आहे.
 प्रत्येक गावातील युवकांनी या काळात समाजहिताचे कल्याणकारी उपक्रम राबवण्यासाठी पुढाकार घ्यावा असे मत या चार विद्यार्थ्यांचे आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने