वरोरा तालुक्यातील मांगली येथे साम्राज्य ग्रुपची निर्मिती.

सुरज भाऊ धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली या ग्रुप निमित्ती.
Bhairav Diwase. Aug 14, 2020

(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
वरोरा:- वरोरा तालुक्यातील मांगली येथे साम्राज्य ग्रुप निमित्ती करण्यात आला आहे.
26/7/2020 रोजी सुरज भाऊ धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा ग्रुप निमित्ती करण्यात आली. व ग्रुप बनविण्याचे कारण हेच की सर्व गावातील मुले ग्रुप च्या माध्यमातून एकत्रित येऊन सर्व प्रकारच्या समस्या आपल्या अडचणी तसेच सर्वाची एकता कायम राहीली पाहिजे या साठी ग्रुप तयार करण्यात आला आहे.
व ग्रुप च्या माध्यमातून गावातील काही चांगले कामे घडतील यासाठी ग्रुप चे मार्गदशक महेश भाऊ देवतळे हे तत्त्पर राहतील. तसेच ग्रुप अध्यक्ष म्हणून सुनिल पिळीगामा व उपअध्यक्ष अमर लोनारे यांची नियुक्ती करण्यात आली. ग्रुप मध्ये नयन टेकाम, सुरज ढोके, समर लोनारे, विक्की पिदुरकर, वैभव चवले, शिवम भुसारी, रामा पुसनाके, राहुल किनाके, आकाश धोटे, प्रवीण धोटे, अनिकेत टेकाम, अमोल उइके, भुषण धोटे, अनिल पिळीगामा, या सर्वांचा समावेश आहे. ग्रुप च्या माध्यमातून भविष्यात गावामध्ये अनेक उपक्रम राबविले जातील व गावातील विकासासाठी व गावातील कोणत्याही कार्यासाठी ग्रुप च्या माध्यमातून कार्य होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या