टेम्बुरवाही येथे दोन कोरोना बाधित.
आज राजुरा तालुक्यात ११ बाधितांची नोंद.
Bhairav Diwase. Aug 14, 2020
राजुरा:- आज राजुरा तालुक्यात अकरा कोरोना बाधितांची नोंद झाली असून येथील एक डॉक्टर सुद्धा कोरोना बाधित झाले आहे. डॉक्टर सोबतच डॉक्टरांचे कुटुंबातील ४ सदस्य सुद्धा बाधित तथा अन्य ७ बाधित झाल्याची माहिती सूत्राकडून मिळाली आहे.
टेम्बुरवाही येथील एका कुटुंबातील दोन मुलं कोरोना बाधित झाल्यामुळे गावातील काही परिसर सील करण्यात आला.