Top News

सभापती कु अल्काताई आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली पशु विभागाची आढावा बैठक.

जनावरांवरील संसर्गजन्य लंप्पीस रोगावर आढावा बैठक.
Bhairav Diwase. Aug 14, 2020

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र जनावरांवरील संसर्गजन्य रोग लंपीस शेतकऱ्यांची झोप उडविलेली आहे. ऐन कामाच्या वेळेस जनावरे आजारी पडत असल्याने शेतकरी बांधव हतबल झालेले आहे. लंप्पी हा रोग संसर्गजन्य असल्याने आजारी जनावरांची संख्या फार झपाट्याने वाढत आहे.

पंचायत समिती पोभुर्णा येथे सभापती कु अल्काताई आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली पशु विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत लंपी आजाराबाबत आधी दिलेल्या सूचना नुसार किती गावांना लसीकरण झाले. आणि लवकरात लवकर प्रत्येक गावात फवारणी करावे. यासाठी सुचना देण्यात आले. नक्कीच जनावर आलेल्या रोगामुळे शेतकरी चिंतेत आहेत. तरी सर्वांनी भावना लक्षात घेऊन प्रत्येक गावात लवकरात लवकर पशु वैद्यकीय विभाग पोहचण्यासाठी सुचना देण्यात आली आहे. यावेळी डॉ दामले सर, डॉ काळे सर, डॉ लाळे सर, डॉ चव्हाण आणि नखाते उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने