श्री. सतिश शिंगाडे सर चेक आष्टा, तालुका पोंभुर्णा यांना शिक्षक सन्मान 2020" पुरस्कार जाहीर.

Bhairav Diwase
सर फाऊंडेशन चंद्रपूरचे जिल्हास्तरिय "शिक्षक सन्मान 2020"पुरस्कार जाहीर.
Bhairav Diwase. Sep 05, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्ण:- सर फाऊंडेशन (SIRF) महाराष्ट्र राज्य उपक्रमशील शिक्षकांचे राज्य स्तरावरील विशाल नेटवर्क असलेले (State Innovation and Research foundation) सर फाऊंडेशन.हे शिक्षकांसाठी हक्काचे व्यासपीठ आहे.
"शिक्षक सन्मान 2020"ही संकल्पना शासनाच्या "थॕंक्स अ टिचर"या उपक्रमाचा भाग आहे. कुणाचेही नामांकन,माहिती न घेता, कोविड19 लाँकडाऊन आणि अनलाँकडाऊन काळातील शैक्षणिक व सामाजिक कार्याचे व नाविण्यपूर्ण उपक्रमाचे योगदान लक्षात घेवून "सर फाऊंडेशन " च्या वतीने आपला गुणगौरव करण्याचा अल्पसा प्रयत्न आहे. प्रथम वर्ष असल्याने आमच्या टीमने 15 तालुक्यातील शिक्षक/शिक्षिकांचा प्रमाणपत्र online देवून सन्मानित करण्यात येणार आहे. निवड समितीच्या एकमताने खालील शिक्षक -शिक्षिकांना पुरस्कार जाहिर करण्यात येत आहे.
पोंभूर्णा- सतिश शिंगाडे चेक आष्टा
वरोरा-अनिल धडसे मारडा, चिमूर-नरेंद्र मुंगले आंबेनेरी, नागभिड-संजय येरणे नवेगाव हुंडेश्वरी, भद्रावती-दुश्यंत मत्ते कोंडा चालबर्डी, चंद्रपूर-नामदेव आस्वले चिंचाळा, सिंदेवाही-नेतराम इंगडकर नलेश्वर मोहाडी, बल्लारपूर-पुरुषोत्तम कन्नाके दहेली जुनी, ब्रम्हपूरी-देवानंद तुळकाने अरेर नवरगाव, मूल-संतोष सोनवाने बाल विकास शाळा मूल, गोंडपिपरी-अर्चना जिडकुंटावार धानापूर, कोरपना-रोशन पिल्लेवान कवटाळा, जिवती-राजेंद्र परतेकी पालडोह, राजुरा-अल्का मसराम कोलगाव, सावली-योगेश पवार रुद्रापूर,
सर्वांचे सन्मानपत्र देवून,सर फाऊंडेशन जिल्हा चंद्रपूर च्या वतीने 5 सप्टेंबर 2020 ला शिक्षक दिनी सन्मानित करण्यात येणार आहे.
असे सागर शंभरकर (राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त) जिल्हा समन्वयक सर फाऊंडेशन MH जिल्हा चंद्रपूर यांनी कळविले आहे.
निवड समिती व सल्लागार म्हणून चाफले सर डायट चंद्रपूर, धनपाल फटिंग गटशिक्षणाधिकारी, कांबळे सर गटशिक्षणाधिकारी,पिसे सर गटशिक्षणाधिकारी, उषा अय्यर केंद्र प्रमुख ,आत्राम सर केंद्र प्रमुख ,विलास सावसागडे केंद्र प्रमुख ,सुरेश राऊत विषय शिक्षक ,कौर मॕडम डायट यांनी निवडीसाठी सहकार्य केले.