ब्रम्हपुरी तालुक्यातील पूरग्रस्त गावांचा सतत आढावा सुरूच.

Bhairav Diwase
खासदार अशोकजी नेते व आमदार बंटीभाऊ भांगडीया यांचेकडून प्रत्यक्ष पाहणी करून विविध सेवांचा पुरवठा.
Bhairav Diwase.    Sep 02, 2020
(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
ब्रम्हपुरी:- ब्रम्हपुरी तालुक्यातील पूरग्रस्त गावात चिमूर गडचिरोली क्षेत्राचे खासदार अशोक नेते व चिमूर विधानसभा क्षेत्राचे कर्तव्यदक्ष आमदार श्री किर्तीकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांचेकडून प्रत्यक्ष पाहणी करून विविध सेवेंचा पुरवठा सुरूच आहे.

   पूरग्रस्त गावात आमदार बंटीभाऊ भांगडीया यांचेकडून घरपोच भोजन पुरवठा सुरू असून गावांतील प्रत्येक रस्ते,चौक, व सार्वजनिक ठिकाणे यांचे निर्जंतुकीकरण करणे सुरू आहे.प्रत्येक बाबींकडे आमदार बंटीभाऊ भांगडीया जातीने लक्ष देत आहे.

     यावेळी भाजपा जेष्ठ नेते वसंतभाऊ वारजूकर, संतोष रडके,सचिन आकुलवार व पदाधिकारी यांची उपस्थिती होती.