नगर परिषद बल्लारपूर चे नगराध्यक्ष यांना कोरोनाची लागण.

Bhairav Diwase
ट्विटरवर व व्हाट्सअप च्या माध्यमातून दिली माहिती.
Bhairav Diwase. Sep 14, 2020
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य संपादक) भैरव दिवसे जिल्हा चंद्रपूर
बल्लारपूर:- नगर परिषद बल्लारपूर चे नगराध्यक्ष हरीषजी शर्मा यांनी दि. 11 सप्टेंबर ला ताप आल्याने 12 सप्टेंबरला कोरोना टेस्ट केली असता. आज दि.14 सप्टेंबर रोजी त्यांची कोरोना रिपोर्ट पॉझिटिव आला आहे. तर या आठवडयात जे कुणी माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तिंनी त्वरित कोरोना चाचणी करुन घ्यावी अशी नगर परिषद बल्लारपूर चे नगराध्यक्ष हरीषजी शर्मा यांनी आग्रहाची विनंती केली आहे. ट्विटरवर व व्हाट्सअप च्या माध्यमातून दिली माहिती. घरीच रहा सुरक्षित रहा, जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे. असे आवाहन नगर परिषद बल्लारपूर प्रशासनानी केले आहे.


1) मास्क वापरत रहावे आणि सामाजिक अंतराचे अनुसरण करावे.

2) पुरेसे गरम पाणी प्या.

3) आयुष मंत्रालयाने दिलेली प्रतिकारशक्ती वाढविणारी औषधे घ्या.

4) घरी किंवा ऑफिसमध्ये हळू हळू काम सुरू करा.

5) पुरेशी झोप आणि आराम करा.

6) योगासन करा

7) दररोज योगासने, प्राणायाम आणि ध्यान करा.

8) डॉक्टरांनी शिफारस केलेले श्वास घेण्याचे व्यायाम करा.

9) सकाळी आणि संध्याकाळी चाला.

10) सहज पचले असा आहार घ्या.

11) धूम्रपान आणि मद्यपान पासून अंतर ठेवा.