रामपूर येथे तुकडोजी महाराज पुतळ्या लगत सर्रास दारूविक्री.

Bhairav Diwase
बसस्थानक बनले दारूविक्रेत्यांचा अड्डा; दारूविक्रेत्यांच्या वडीलांवर आहे गुन्हे दाखल.

दारू विक्रेत्यांना कुणाचेच भय नाही का?
Bhairav Diwase.    Sep 14, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- शहरालगत असलेल्या रामपूर येथील तुकडोजी पुतळ्यालगत दारू विक्रेत्यांचा मोठ्या प्रमाणात हैदोस सुरु असून राजुरा-माथरा मार्गावरील असलेल्या बसस्थानकाला दारू विक्रेत्यांचा विळखा बसला असून सद्या या बसस्थानकातून मोठ्या प्रमाणात दारू विक्री होत असून दारू बसस्थानकच विक्रीचा अड्डा बनला असून तुकडोजी महाराजांच्या पुतळ्याला ग्रासले आहे. असल्यामुळे या ठिकानावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
   स्वतःला समाजसेवक समजणाऱ्या बेरोजगार काही आंबट शौकीन युवकांनी काहींना सोबत घेऊन गावात अवैद्य धंदे सुरु केले आहे. पडद्यामागे उभा राहून शिक्षण घेणाऱ्या युवकांना आपल्या जाळ्यात ओढून दारू विक्री, जुगार, गांजा विक्रीच्या कामाला लावत आहे. अशा समाज कंटकाला पकडून पोलिसी खाक्या दाखविण्याची गरज आहे.
अवैद्य धंद्यामध्ये बहुतांश वीस ते पंचवीस वर्षाखालील युवक असून हे आंबट शौकीन बसस्थानक परिसरात बसून असते. बसस्थानकापासून येणार जाणाऱ्यासोबत विनाकारण वाद घालून शिवीगाळ करण्याचा प्रकार हा सातत्याचा झाला असून प्रवासी निवाऱ्यात महिलांना थांबणे हे त्यांच्या जीवाला धोक्याचे असून यात बहुतांश वेळा सट्टा व दारूविक्रेते आपले थैमान मांडून बसत असल्याने सामान्य नागरिकांना अडचणीचे ठरत आहे.
   यापूर्वी यापरीसारतील दारूविक्रेत्यांवर गुन्हे दाखल असून आता त्यांच्या मुलांनी दारू विक्रीचा धंदा सुरु केला असून रात्रो-बेरात्री येरणे ले-आउट येथे ठोक दारू विक्रेते दारू आणून देत असून ती दारू जंगलात लपवून गरजेनुसार हे दारू विक्रेते बसस्थानक परिसरात आणून विकत आहे.
येथील व्यसनाला आळा बसावा व  गावात शांतता, शिस्त व चांगल्या सवयी लागाव्या या उद्देशातून येथील नागरिकांनी अथक परिश्रमाने बसस्थानका लगत तुकडोजी महाराजांचा पुतळा उभारून सुंदर परिसराची निर्मिती केली, परंतु येथील आंबट शौकिनांना ते आवडले नसतील त्यामुळेच रस्त्याने ये-जा करणाऱ्यांना घेरून दारू विक्री करीत आहे. अस्या युवकांना वेळीच चाप देणे गरजेचे असून पोलिसांनी तुकडोजी महाराज पुतळ्याजवळ गस्त घालून दारूविक्रेत्यांवर कारवाही करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.